दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 15:52 IST2021-03-06T15:52:13+5:302021-03-06T15:52:41+5:30

जखमी झालेल्या इसमास जालना येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

Two two-wheelers colliding head-on; One killed, one injured | दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, एक जखमी

दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, एक जखमी

जालना : तालुक्यातील जामवाडी येथील वळण रस्त्यावर शनिवारी सकाळी दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक ठार, तर एकजण  गंभीर जखमी झाला आहे. आदित्य दत्तात्रय भोपळे (रा. सिव्हील कॉलनी देऊळगावराजा) असे मयताचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

आदित्य भोपळे हे जालना येथून शनिवारी सकाळी दुचाकीने देऊळगाव राजा येथे जात होते.  वाघ्रुळ येथे दुचाकीवरून भाजीपाला  घेवून एक इसम येत होता. जामवाडी येथील वळण रस्त्यावर आल्यावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आदित्य  भोपळे हे जागीच ठार झाले.  तर जखमी झालेल्या इसमास जालना येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Two two-wheelers colliding head-on; One killed, one injured