वाळू माफियांचा हैदोस! शेतमजुराला चिरडून हायवा मालकाचा पोबारा; नातेवाइकांनी एसडीओसमोर ठेवला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:24 IST2026-05-15T16:24:01+5:302026-05-15T16:24:48+5:30

वाळू माफियांच्या हायवाने शेतमजुराला चिरडले; तहसील कार्यालयासमोर मृतदेह ठेवून नातेवाईकांचा संताप.

Sand Mafia Out of Control in Jalna! Young Labourer Killed; Angry Relatives Block SDO Office with Dead Body | वाळू माफियांचा हैदोस! शेतमजुराला चिरडून हायवा मालकाचा पोबारा; नातेवाइकांनी एसडीओसमोर ठेवला मृतदेह

वाळू माफियांचा हैदोस! शेतमजुराला चिरडून हायवा मालकाचा पोबारा; नातेवाइकांनी एसडीओसमोर ठेवला मृतदेह

भोकरदन (जि. जालना): तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा धुमाकूळ सुरूच असून, या मुजोरीचा बळी गव्हाण संगमेश्वर येथील कचरू पांडुरंग ढवळे (वय ३०) या शेतमजुराला द्यावा लागला आहे. १४ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पायी शेतात जात असताना बांध नदीच्या पुलावर वाळूने भरलेल्या हायवाने कचरू यांना पाठीमागून जोरदार धडक देऊन चिरडले.

रुग्णवाहिका तहसीलवर अन् तणाव
अपघातानंतर कचरू यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. १५ मे रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी कचरू यांचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका थेट उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयासमोर आणली. जोपर्यंत गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

प्रशासनाचा हस्तक्षेप
सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांशी चर्चा केली. दोषी हायवा चालक आणि मालकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर कचरू यांच्यावर गव्हाण संगमेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आरोपींचा गुन्हेगारी इतिहास
धक्कादायक बाब म्हणजे, ज्या हायवा मालकावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे, त्यानेच यापूर्वी राजूर येथे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. एकाच आठवड्यात बाभूळगाव येथेही वाळूच्या हायवाने दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून, परिसरात वाळू माफियांच्या दहशतीमुळे संताप व्यक्त होत आहे.

Web Title : बालू माफिया का कहर: किसान कुचला, मालिक फरार, परिजनों का विरोध

Web Summary : भोकरदन में बालू से भरे ट्रक ने एक किसान को कुचल दिया। आक्रोशित परिजनों ने कार्रवाई के आश्वासन तक शव के साथ विरोध प्रदर्शन किया। ट्रक मालिक का हिंसा का पुराना इतिहास है। बालू माफिया से इलाके में दहशत है।

Web Title : Sand Mafia Rampage: Farmer Crushed, Owner Flees, Relatives Protest

Web Summary : A farmer was crushed by a sand-laden truck in Bhokardan. Outraged relatives protested with the body until assurances of action were given. The truck owner has a prior history of violence. Sand mafia terrorizes the area.