शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

स्काऊट-गाईड जिल्हा कार्यालयात कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

कारवाईची मागणी जालना : शहरासह परिसरात अवैधरित्या दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तळीरामांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, महिलांनाही ...

कारवाईची मागणी

जालना : शहरासह परिसरात अवैधरित्या दारूविक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तळीरामांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध दारूविक्रेत्यांवर सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सेलगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रम

सेलगाव : बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शालेय समितीचे अध्यक्ष संदीप अंभोरे, काकासाहेब अंभोरे, शेख फारुख, मुख्याध्यापक अरविंद खरात राजेंद्र कायंदे, संजीव महेश्री, श्यामराव देशमुख, अशोक मुर्तरकर, जगत घुगे, विनय जोशी, संदानंद शिंदे, प्रकाश औंढेकर, जोत्स्ना बिडकर, मनीषा पाटील, सुनीता पडूळ, मनीषा बोंडले, सीमा कुळकर्णी, स्वाती कोरडे, योगिता दैने यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

विस्कळीत सेवेमुळे मोबाईलधारक हैराण

परतूर : शहरासह ग्रामीण भागातील दूरसंचारची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे एकमेकांशी संपर्क साधणे मुश्किल झाले असून, इंटरनेटही सुरळीत चालत नाही. इंटरनेटअभावी शासकीय, निमशासकीय कामकाजावरही मोठा परिणाम होत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी होत आहे.

अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी

भोकरदन : शहरातील जालना मार्गावरील महावितरण कार्यालयासमोरील नगर परिषदेच्या सर्व्हिस रस्त्यावर अतिक्रमण करून गाळे बांधण्यात आले आहेत. हे अतिक्रमण त्वरित हटवावे, अन्यथा उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा बाबासाहेब पगारे यांनी दिला आहे. याप्रकरणात प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

तहसीलसमोर छावा संघटनेचे धरणे आंदोलन

जालना : तालुक्यातील दगडवाडी परिसरातील राजूर मार्गावरील पोल्ट्री फार्म स्थलांतरित करावे, या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी किरण चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद भुसारे आदींची उपस्थिती होती. आंदोलकांची प्रदेशाध्यक्ष पंकज जऱ्हाड, मनसे जिल्हाध्यक्ष गजानन गिते, तालुकाध्यक्ष समाधान दराडे, रोषणगावचे सरपंच योगेश शिंदे आदींनी भेट घेऊन चर्चा केली.