शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
2
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
3
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
4
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
5
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
6
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
7
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
8
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
9
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
10
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
11
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
12
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
13
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
15
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
16
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
17
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
18
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
19
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:53 IST

जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी मारून जीवन संपवले.

जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शाळेच्या छतावरून तेरा वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोही दिपक बिटलान असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे.  या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षकांवर आरोप केले आहेत.  

दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?

ही विद्यार्थीनी आठवी इयत्तेत शिकत होती. शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी घेऊन आत्महत्या केली. जालना जिल्ह्यातील मस्तगड या गावात तिचे घर आहे. आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

सांगलीतील विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील ढवलश्वर गावचा रहिवासी असलेल्या शौर्य प्रदीप पाटील (१६) या १० वीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने दिल्ली आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. शौर्यने त्याच्या शाळेतील शिक्षकांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

शौर्यच्या मृत्यूनंतर दिल्लीमध्ये त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कॅन्डल मार्च काढले जात असून, शाळा प्रशासनाविरुद्ध तीव्र विरोध प्रदर्शन सुरू आहे. मंगळवारी ही हृदयद्रावक घटना घडली. पोलीस तपासणीत शौर्यच्या बॅगेत दीड पानाची सुसाइड नोट सापडली, जी या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. सुसाइड नोटमध्ये शौर्यने स्पष्ट लिहिले की, "स्कूल वालों ने इतना बोला कि मुझे यह करना पड़ा... स्कूल की टीचर है ही ऐसी, क्या बोलूं…" त्याने थेट शाळेच्या मुख्याध्यापिका आणि तीन शिक्षिकांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna: 13-Year-Old Student Ends Life; Reason Unclear, Parents Allege Harassment

Web Summary : A 13-year-old girl in Jalna tragically ended her life by jumping from a school roof. Parents allege teacher harassment as the cause. Separately, a student from Sangli committed suicide in Delhi, citing school-related mental harassment in a suicide note, sparking protests.
टॅग्स :jalna-acजालनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस