भोकरदन (जालना): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भोकरदन येथे आयोजित कार्यक्रमात राजकीय चकमक पाहायला मिळाली. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यात जॅकेटवरून जुंपली. चंद्रकांत दानवेंनी रावसाहेब दानवेंच्या जॅकेटवर टिप्पणी करताच, रावसाहेब दानवेंनी थेट जुन्या आठवणींना उजाळा देत पलटवार केला.
किस्सा १०० रुपयांच्या जॅकेटचा!चंद्रकांत दानवे भाषणात म्हणाले होते की, "रावसाहेब दानवेंनी जॅकेट घातले असल्याने त्यांना गर्मी होत असेल, आयोजकांनी आता कार्यक्रम आटोपता घ्यावा." याला उत्तर देताना रावसाहेब दानवे म्हणाले, "मी जॅकेट का घालतो हे चंद्रकांतला माहीत नाही. तुझे वडील पुंडलिकराव दानवे खासदार असताना आम्ही दिल्लीला गेलो होतो. तिथे मी १०० रुपयांचे एक जॅकेट घेतले होते. ते जॅकेट तुझ्या वडिलांना इतके आवडले की त्यांनी ते घातले आणि परत दिलेच नाही. तेव्हापासून मी जॅकेट घालायला सुरुवात केली."
विंचू उतरवण्याचे मंत्र माहीत नसतील तर...केवळ किस्सा सांगून न थांबता रावसाहेब दानवे यांनी चंद्रकांत दानवेंना इशाराही दिला. "विंचू उतरायचे मंत्र माहीत नसतील तर सापाच्या बिळात हात घालायचा प्रयत्न करू नये," अशा ग्रामीण ढंगातील शब्दांत त्यांनी चंद्रकांत दानवे यांचे कान टोचले. या शाब्दिक चकमकीमुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला आणि राजकीय वातावरणही तापले.
Web Summary : Raosaheb Danve and Chandrakant Danve clashed over a jacket at an event. Raosaheb recounted a story about a jacket he bought for ₹100 that Chandrakant's father liked. He also warned Chandrakant to avoid unnecessary risks.
Web Summary : एक कार्यक्रम में रावसाहेब दानवे और चंद्रकांत दानवे के बीच जैकेट को लेकर बहस हुई। रावसाहेब ने ₹100 के जैकेट की कहानी सुनाई जो चंद्रकांत के पिता को पसंद आई थी। उन्होंने चंद्रकांत को अनावश्यक जोखिमों से बचने की चेतावनी भी दी।