पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या ४० वर्षीय इसमाचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 05:41 PM2020-11-28T17:41:13+5:302020-11-28T17:42:16+5:30

पहाटे ३ वाजेच्या सुमारास शेळ्यांचा आवाज आल्याने त्यांच्या पत्नीला जाग आली.

40-year-old man, who was sleeping in a shed, was stabbed to death | पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या ४० वर्षीय इसमाचा चाकूने भोसकून खून

पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या ४० वर्षीय इसमाचा चाकूने भोसकून खून

Next
ठळक मुद्देघनसावंगी सूतगिरणी जवळील वस्तीवरील घटना

तीर्थपुरी : पत्राच्या शेडमध्ये झोपलेल्या ४० वर्षीय इसमाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घनसावंगी जवळील सूतगिरणी येथे शनिवारी पहाटे घडली. मारूती विश्वनाथ जाधव (४० रा. बहिरेगाव) असे मयताचे नाव आहे.

घनसावंगी तालुक्यातील बहिरेगाव येथील मारुती जाधव हे आपल्या कुटुंबासह घनसावंगी-अंबड रोडवरील मत्स्योदरी सहकारी सूतगिरणीजवळ असलेल्या भिल्ल वस्तीत राहतात. शुक्रवारी रात्री मारोती जाधव हे शेळ्याजवळ पत्राच्या शेडमध्ये ऐकटेच झोपले होते. त्यांची पत्नी मुलांसह घरात झोपली होती. पहाटे ३ वाजेच्या सुमारास शेळ्यांचा आवाज आल्याने त्यांच्या पत्नीला जाग आली. जाधव यांना आवाज दिला असता, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यानंतर पतीचा खून झाल्याचे त्यांना कळाले. 

घटनेची माहिती मिळताच अंबडचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अभय देशपांडे, पोनि शिरीष हुंबे, पोउपनि पांडुरंग माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या मानेवर व गळ््यावर चाकूचे वार दिसून आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. मयताचा भाऊ रामदास विश्वनाथ जाधव यांच्या फियार्दीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि पांडुरंग माने हे करीत आहेत.

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी उपस्थित अधिकाºयांना तातडीने तपास लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, खूनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

Web Title: 40-year-old man, who was sleeping in a shed, was stabbed to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.