शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय लष्कराविरुद्ध दहशतवाद्यांचा वापर

By admin | Updated: November 5, 2014 01:24 IST

पाकिस्तानात दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या आश्रयाचा आढावा सादर करताना अमेरिकन लष्कर पेंटगॉनने अमेरिकी काँग्रेसला असे स्पष्ट सांगितले आहे

वॉशिंग्टन : पाकिस्तानात दहशतवाद्यांना दिल्या जाणाऱ्या आश्रयाचा आढावा सादर करताना अमेरिकन लष्कर पेंटगॉनने अमेरिकी काँग्रेसला असे स्पष्ट सांगितले आहे की, भारताच्या सक्षम लष्कराशी थेट लढण्याची पाकची क्षमता नाही, त्यामुळे भारताविरोधात पाक दहशतवाद्यांचा वापर करत आहे. अफगाण व भारत यांच्याविरोधात कारवाया करणारे दहशतवादी पाकिस्तानात आश्रय घेतात. अफगाण व परिसरासाठी ही धोकादायक बाब आहे. तसेच पाकिस्तान भारताच्या सुपर लष्कराच्याविरोधात दहशतवाद्यांचा वापर करत आहे, असे पेंटगॉनतर्फे काँग्रेसला सांगण्यात आले. अफगाणिस्तानातील सध्याच्या स्थितीवर सहा महिन्यांच्या अहवालात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. अफगाणिस्तानला मदत करण्याच्या गोष्टी पाकिस्तान वरवर बोलतो; पण दहशतवादी संघटनांच्या कारवाया अफगाण पाक संबंधात बाधा आणतात, असे पेंटगॉनने या १०० पानी अहवालात म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाआधी भारताच्या हेरत येथील दूतावासावर हल्ला करण्यात आला. चार सशस्त्र हल्लेखोरांनी मे महिन्यात अफगाणिस्तानातील हेरत येथील भारतीय दूतावासावर हल्ला केला होता.हा हल्ला शपथविधीच्या फक्त तीन दिवस आधी करण्यात आला. जूनमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने लष्कर ए तोयबा ही संघटना या हल्ल्यास जबाबदार असल्याचे जाहीर केले. अफगाण अध्यक्षांनी या हल्ल्याचा निषेध करून भारताला पाठिंबा जाहीर केला होता, असे या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)