शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

Taliban War:खुद्द अमेरिका हैराण! एकही युद्ध लढले नाहीत, तरीही जिंकण्याच्या तयारीत तालिबान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 9:15 PM

Afghanistan- Taliban War: उज्बेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानला लागून असलेल्या सीमेवर बॉर्डर पोस्ट ताब्यात घेण्यासाठी भयंकर लढाई सुरु आहे. जोवजान आणि बल्ख प्रांतांमध्ये तालिबानला आपला दबदबा वाढवायचा आहे.

काबुल : अफगाणिस्तानमधून (Afghanistan) अमेरिकेने (America) २० वर्षांपासून तळ ठोकून असेलेले सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबानने (Taliban) कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. कंदाहर सारख्या शहरांना ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी दहशतवादी राजधानी काबुलच्या दिशेने कुच करू लागले आहेत. यामुळे तिकडे अमेरिका हैरान झाली आहे. एकाही युद्धाचा अनुभव नसताना तालिबान कसे काय एवढी मजल मारू शकते असा प्रश्न पडला आहे. (How Taliban winning in Afghanistan; America in tension)

तालिबानी मोजून दमले! पाकिस्तान सीमेनजीक अफगान सैन्याच्या चौकीवर तीन अब्ज रुपये सापडले

तालिबानने अफगानिस्तानच्या सीमेवरील अनेक पोस्टवर कब्जा केला आहे. नुकतेच तीन अब्ज पाकिस्तानी रुपये सापडल्याचे वृत्त आले होते. जास्त रक्तपात न करता अफगाणिस्तान कसे काय देश जिंकण्याची तयारी करत आहे, असा प्रश्न अमेरिकेच्या बड्या बड्या अधिकाऱ्यांसमोर पडला आहे. ज्या बॉर्डर पोस्टवर तालिबानचा कब्जा आहे तेथील व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे सरकारला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मालवाहतूक ठप्प झाल्याने काबुलमध्ये अन्न धान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. 

अफगाणिस्तानचे अशरफ गनी सरकार सध्या काहीच पोस्टवर आपला ताबा ठेवून आहेत. इराण, पाकिस्तानच्या सीमेवरून 2.9 अब्ज डॉलरचा व्यापार होतो. तालिबानच्या ताब्यात यापैकी 0.9 अब्ज डॉलरचा व्यापार होणारी पोस्ट गेली आहेत. उरलेल्या पोस्टवर तालिबान कब्जा करण्यासाठी रणनिती आखत आहे. अमेरिकेला या तालिबानच्या खतरनाक प्लॅनची चिंता वाटू लागली आहे. 

भयंकर युद्ध सुरुउज्बेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानला लागून असलेल्या सीमेवर बॉर्डर पोस्ट ताब्यात घेण्यासाठी भयंकर लढाई सुरु आहे. जोवजान आणि बल्ख प्रांतांमध्ये तालिबानला आपला दबदबा वाढवायचा आहे. अफगाणिस्तान चारही बाजुंनी जमिनीने वेढलेला आहे. तालिबानने काबुलला होणारी मालवाहतूक रोखली आहे. यामुळे काबुलमध्ये मोठा टंचाई होण्याची शक्यता आहे. तालिबानला एवढा मोठा प्लॅन कोणी सुचविला, याच कोड्यात अमेरिका पडली आहे. तालिबान अफगाणिस्तानचे वीजनिर्मिती प्रकल्प, सरकारी यंत्रणा बंद पाडण्याच्या प्रयत्नात आहे. एक दिवस आधीच राष्ट्रपतींच्या नमाजावेळी तालिबानने काही रॉकेट डागले आहेत. सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ग्रीन झोनमध्ये रॉकेट आदळल्याने लोकांमध्येही आता भीतीचे वातावरण पसरू लागले आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानwarयुद्धAmericaअमेरिका