होर्मुज पेच: जपानचा युद्धनौका पाठवण्यास नकार; मॅक्रॉन यांचा इराणला फोन गेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 09:48 IST2026-03-16T09:47:03+5:302026-03-16T09:48:29+5:30

Strait of Hormuz Crisis Update: जपानने होर्मुजमध्ये नौदल पाठवण्यास नकार दिला आहे. ट्रम्प आंतरराष्ट्रीय युतीची घोषणा करण्याची शक्यता. मॅक्रॉन आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा. वाचा सविस्तर.

Strait of Hormuz Crisis Update: Japan refuses to send warship; Trump prepares for 'international coalition', Macron calls Iran... | होर्मुज पेच: जपानचा युद्धनौका पाठवण्यास नकार; मॅक्रॉन यांचा इराणला फोन गेला...

होर्मुज पेच: जपानचा युद्धनौका पाठवण्यास नकार; मॅक्रॉन यांचा इराणला फोन गेला...

मध्य पूर्वेकडील तणाव शिगेला पोहोचला असताना 'होर्मुजच्या सामुद्रधुनी'वरून जागतिक राजकारण चांगलेच तापले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांना लष्करी मदतीचे आवाहन केले असले, तरी जपानने तूर्त आपल्या युद्धनौका या भागात पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दुसरीकडे, फ्रान्स आणि ब्रिटनने मुत्सद्दी मार्गाने हा तिढा सोडवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

जपानच्या पंतप्रधानांनी संसदेत स्पष्ट केले की, होर्मुजमध्ये तेल टँकर्सच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवण्याचा सध्या कोणताही विचार नाही. "आम्ही सध्या कायदेशीर चौकटीत राहून काय शक्य आहे, याचा अभ्यास करत आहोत," असे सांगत जपानने लष्करी सहभागापासून स्वतःला दूर ठेवले आहे. जपानची अर्थव्यवस्था आखाती तेलावर अवलंबून असूनही त्यांनी घेतलेली ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

मॅक्रॉन-पेजेशकियन यांच्यात चर्चा
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी फोनवर चर्चा केली. होर्मुजमधील वाहतुकीचे स्वातंत्र्य तातडीने बहाल करण्यात यावे, अशी मागणी मॅक्रॉन यांनी केली. "वाढत्या लष्करी हालचाली संपूर्ण प्रदेशाला अराजकतेकडे ढकलू शकतात, ज्याचे परिणाम अनेक वर्षे भोगावे लागतील," अशी चेतावणीही त्यांनी दिली.

ट्रम्प यांची 'इंटरनॅशनल अलायन्स'ची योजना
'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासन या आठवड्यात होर्मुजसाठी एका 'आंतरराष्ट्रीय युती'ची  घोषणा करू शकते. अनेक देशांनी या जलमार्गाच्या सुरक्षेसाठी एकत्र येण्यास संमती दर्शवल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान किम स्टार्मर यांनीही ट्रम्प यांच्याशी या विषयावर चर्चा केली असून, जागतिक शिपिंगवर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

आर्थिक संकटाची टांगती तलवार
ब्रिटीश पंतप्रधान स्टार्मर यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशीही चर्चा केली आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीत आखाती युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि सुरक्षा उपाययोजना यावर सविस्तर चर्चा होणार आहे.

कोणाची काय भूमिका?

  • जपान: जपानच्या पंतप्रधानांनी संसदेत स्पष्ट केले की, सध्या युद्धनौका पाठवण्याची कोणतीही योजना नाही. जपान आपल्या स्तरावर कायदेशीर चौकटीत राहून काय शक्य आहे, याचा केवळ अभ्यास करत आहे.

  • ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियानेही अमेरिकेची मागणी फेटाळली असून, आपल्या सध्याच्या संरक्षण कटिबद्धतांमुळे या मोहिमेत सहभागी होता येणार नसल्याचे म्हटले आहे.

  • तुर्की: तुर्कीनेही या लष्करी कारवाईत थेट सहभागी होण्यास नकार दिला असून, मुत्सद्दी मार्गाने तोडगा काढण्यावर भर दिला आहे.

Web Title : होर्मुज जलडमरूमध्य: जापान का युद्धपोत भेजने से इनकार; मैक्रॉन ने ईरान को फोन किया।

Web Summary : बढ़ते तनाव के बीच, जापान ने होर्मुज में युद्धपोत भेजने से इनकार किया। मैक्रॉन ने ईरान से निर्बाध मार्ग सुनिश्चित करने का आग्रह किया। ट्रम्प ने जलमार्ग सुरक्षा के लिए अंतर्राष्ट्रीय गठबंधन की योजना बनाई, जिससे वैश्विक आर्थिक चिंताएं और राजनयिक प्रयास शुरू हो गए।

Web Title : Hormuz Strait: Japan Refuses Warships; Macron Calls Iran.

Web Summary : Amidst rising tensions, Japan declines sending warships to Hormuz. Macron urges Iran to ensure free passage. Trump plans international alliance for waterway security, sparking global economic concerns and diplomatic efforts.