शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

कवटीवरील त्वचेचे पहिल्यांदाच प्रत्यारोपण

By admin | Updated: June 6, 2015 00:18 IST

मेंदूचा सुरक्षितपणे सांभाळ करणाऱ्या कवटीवरील त्वचेचे प्रत्यारोपण करण्याची किमया अमेरिकेतील डॉक्टरांनी साधल्याने प्रत्यारोपणाच्या बाबतीत वैद्यकीय क्रांती सिद्ध झाली आहे.

ह्यूस्टन : मेंदूचा सुरक्षितपणे सांभाळ करणाऱ्या कवटीवरील त्वचेचे प्रत्यारोपण करण्याची किमया अमेरिकेतील डॉक्टरांनी साधल्याने प्रत्यारोपणाच्या बाबतीत वैद्यकीय क्रांती सिद्ध झाली आहे. अशाप्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असून हे तंत्र उभ्या जगासाठी वरदान ठरणार आहे. कर्करोग झालेल्या ५५ वर्षाच्या माणसाला डोक्याला मोठी जखम झाल्याने त्याच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ती तब्बल १५ तास चालली. ह्यूस्टनच्या मेथॉडिस्ट इस्पितळातील एम डी अँडरसन कर्करोग केंद्रातील डॉक्टरांनी २२ मे रोजी झालेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेची माहिती गुरुवारी जाहीर केली. जेम्स बॉयसन असे रुग्णाचे नाव असून, तो सॉफ्टवेअर क्षेत्रात आॅस्टिन येथे कार्यरत आहे. याच इस्पितळात त्याच्यावर मूत्रपिंड व स्वादुपिंड यांचे तसेच क्रेनोफेशियल टिश्यूचे प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर बॉयसनचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात कानापासून २.५ से मी. अंतरावर डोक्यावर टाके घातलेले दिसत आहेत. कवटी व केस येणारी त्वचा एकमेकाला जोडण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट असल्याचे प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या पथकाचे प्रमुख डॉ. मायकेल क्लीबक यांनी सांगितले. मूलत: कवटीत नसलेली हाडे डोक्याच्या त्वचेवर बसविलेली आहेत, तसेच डोक्याच्या रक्तवाहिन्याही योग्य प्रकारे जोडण्यात आल्या आहेत असे क्लीबक यांनी सांगितले. बॉयसन शस्त्रक्रियेनंतर बरा झालेला दिसत असून, डोक्याचे स्पंदनही चालू आहे. बॉयसन याला डोक्याची कवटी व त्वचा यावर वेगवेगळे कर्करोग होते. त्यावर शस्त्रक्रिया करताना त्याला मोठी जखम झाली होती. १९९२ साली मधुमेहातून वाचविण्यासाठी त्याच्या शरीरात मूत्रपिंड व स्वादुपिंड यांचे प्रत्यारोपण झाले. पाच वर्षाचा असल्यापासून हे अवयव निकामी होऊ नयेत म्हणून तो औषधे घेत आहे. प्रतिकार क्षमता नियंत्रणात ठेवण्याची औषधे अवाजवी प्रमाणात द्यावी लागल्यास कर्करोग होण्याचा धोका असतो. तसाच दुर्मीळ कर्करोग झाल्यावर घेतलेल्या किरणोत्साराच्या उपचाराने त्याच्या डोक्याचा काही भाग नष्ट झाला होता. या शस्त्रक्रियेने मला नवजीवन दिले, असे बॉयसनने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)४एकाचवेळी तीन अवयवांचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया प्रथमच करण्यात आली असून कवटीवर त्वचेचे प्रत्यारोपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. - डॉ. मायकेल क्लीबक