शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
2
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
3
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
4
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
5
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
6
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
7
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
8
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
9
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
10
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
11
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
12
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
13
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
15
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
16
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
17
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
18
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
19
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
Daily Top 2Weekly Top 5

नाइटक्लबचा स्लॅब कोसळला, 66 जणांचा मृत्यू; अनेक हाय-प्रोफाइल लोकांचाही समावेश - बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:11 IST

या दुर्घटनेत तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर किमान १६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत...

डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी असलेल्या सँटो डोमिंगो येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास एक भयावह दुर्घटना घडली. येथे एका नाईट क्लबमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असतानाच अचानकपणे स्लॅब अथवा छत कोसले. या दुर्घटनेत तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर किमान १६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सँटो डोमिंगो येथील प्रसिद्ध नाईट क्लब 'जेट सेट' मध्ये ही दुर्घटना घडली. 'जेट सेट' नाईट क्लब हे सँट डोमिंगोतील एक प्रमुख सांस्कृतिक स्थळ मानले जाते. यावेळी अनेक हाय-प्रोफाइल लोक उपस्थित होते. यात राजकारणी, खेळाडू आणि संगीत प्रेमींचा समावेश होता. क्लबचे छत कोसळल्याने अनेक जण त्याखाली दबले गेले.

या दुर्घटनेनंतर, तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यात आले. दरम्यान, "आम्हाला विश्वास आहे की, त्यांपैकी अनेक लोक अद्यापही जिवंत आहेत आणि ढिगाऱ्याखालील शेवटची व्यक्ती जोवर बाहेर येणार नाही, तोवर येथील स्थानिक सरकार हार मानणार नाही," असे आपत्कालीन ऑपरेशन सेंटरचे संचालक जुआन मॅन्युएल मेंडेझ यांनी म्हटले होते. महत्वाचे म्हणजे घटनेच्या १२ तासांनंतरही परिस्थिती गंभीर होती. अग्निशमन दलाचे जवान लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्यासाठी लाकडी फळ्या आणि ड्रिलचा वापर करत होते. 

या दुर्घटनेतील मृतांमध्ये, माजी मेजर लीग बेसबॉल ऑल-स्टार नेल्सन क्रूझ यांची बहिण तथा मॉन्टेक्रिस्टि प्रांताच्या गव्हर्नर नेल्सी क्रूझ यांचाही समावेश आहे. फर्स्ट लेडी रॅकेल अर्बाजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेल्सी क्रूझ यांनी राष्ट्रपती लुइस अबिनाडेर यांना रात्री 12:49 वाजण्याच्या सुमारास एक इमरजन्सी कॉल  केला होता. यात त्यांनी आपण ढिगाऱ्याखाली अडको असल्याचे म्हटले होते. यानंतर, रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तसेच, ही एक मोठी शोकांतिका असल्याचेही अरबाजे यांनी म्हटले आहे.

या दुर्घटनेने  केवळ डोमिनिकन रिपब्लिकच नव्हे, तर संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. या घटनेनंतर सरकारने पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि बचाव कार्यांना प्राधान्य दिले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल