शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

Pakistan: तालिबानने पाकिस्तानला आणखी भिकेला लावले; रुपया जोरात आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 2:44 PM

Taliban power Pakistan Loss: पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात आहे. चीनचे अब्जावधींचे कर्ज फेडण्यास पाकिस्तानला जमलेले नाही. तसेच सौदी अरेबियासह अन्य देशांचे देखील पाकिस्तान देणे आहे.

अफगाणिस्तानमध्येतालिबान राज येण्यासाठी पाकिस्तानने मोठे कारस्थान रचले होते. अमेरिकेचा पैसा, शस्त्रे पाकिस्ताननेतालिबानींना प्रशिक्षण देण्यासाठी वापरली होती. परंतू आता अफगाणिस्तानमध्ये आलेल्या तालिबानमुळे आधीच कंगाल झालेला पाकिस्तान भिकेला लागला आहे. 

Afghanistan: अफगानिस्तान एकेकाळी भारताचा भाग होता; महाराजा चंद्रगुप्त मौर्य यांनी 500 हत्तींच्या मदतीने जिंकलेला

पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात आहे. चीनचे अब्जावधींचे कर्ज फेडण्यास पाकिस्तानला जमलेले नाही. तसेच सौदी अरेबियासह अन्य देशांचे देखील पाकिस्तान देणे आहे. त्यातच पाकिस्तानने त्याला अमेरिका, युएनकडून मिळालेली मदत ही भारताविरोधात दहशतवादी कारवायांवर वापरली. तसेच तालिबानी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरली. यामुळे पाकिस्तानच्या हाती आता छदामही राहिलेला नाही. 

चलन बाजारात पाकिस्तानी रुपयामध्ये मोठी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया हा 169.9  एवढ्या ऐतिहासिक स्तरावर कोसळला आहे. 14 मे पासून या पाकिस्तानी रुपयामध्ये 18 रुपयांची घसरण झाली आहे. गुरुवारीदेखील हा रुपया 169 च्या खालीच होता. 

Afghaistan: पाकिस्तानला डबलगेमची किंमत चुकवावी लागणार; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

अवघ्या आशियाभरात पाकिस्तानी रुपयाची नाचक्की झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तालिबानची अफगाणिस्तानमध्ये आलेली सत्ता म्हटले जात आहे. याला अंतर्गत कारणेही जबाबदार आहेत. Alpha Beta कोरचे एक्सपर्ट खुर्रम शहजाद यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमुळे पाकिस्तानी रुपयावर मोठा दबाव आहे. अमेरिकेने जेव्हा अफगाणिस्तान सोडले तेव्हापासून रुपयावर दबाव सुरु झाला आहे. ऑगस्टमध्ये पाकिस्तानचा व्यापारी तोटा 133 टक्क्यांनी वाढून 4.05 अब्ज डॉलरवर गेला आहे. State Bank of Pakistan ने देखील यावर काहीही पाऊल उचललेले नाही.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान