Afghaistan: पाकिस्तानला डबलगेमची किंमत चुकवावी लागणार; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 08:31 AM2021-09-15T08:31:47+5:302021-09-15T08:32:24+5:30

Pakistan, Taliban, Afghanistan: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये काही खासदारांनी पाकिस्तानला एवढी मदत देऊ नका, अद्ययावत शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने देऊ नका, ती दहशतवादाविरोधात न वापरता भारताविरोधात कारवायांसाठी वापरली जातात असे अनेक सदस्यांनी सांगितले होते. परंतू अमेरिकी नेतृत्व त्याकडे दुर्लक्ष करत होते.

Pakistan played double game with America; Helping Taliban in Afghanistan | Afghaistan: पाकिस्तानला डबलगेमची किंमत चुकवावी लागणार; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Afghaistan: पाकिस्तानला डबलगेमची किंमत चुकवावी लागणार; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

googlenewsNext

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमध्ये (Afghaistan) पाकिस्तान जे वागला ते साऱ्या जगाने पाहिले. दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी अमेरिकेने दिलेली शस्त्रे, लढाऊ विमाने, पैसा पाकिस्तानने (Pakistan) तालिबानी (Taliban) दहशतवाद्यांना वापरायला दिली, त्यांच्यासाठी वापरली. एवढेच नाही तर गेली कित्येक वर्षे पाकिस्तान आपल्या भूमीत तालिबानी दहशतवाद्यांना लढाईचे प्रशिक्षण देत होता. पाकिस्तानचा हा डबलगेम अफगाणिस्तानच्या निमित्ताने बाहेर आला असून भारत एवढी वर्षे जगाला ओरडून सांगत होता, ते आता त्यांना पटू लागले आहे. पाकिस्तानला हा डबलगेम चांगलाच महागात पडणार आहे. अमेरिकेने पाकिस्तानसोबत संबंध तोडण्याची तयारी केली आहे. (Pakistan Help Taliban, Haqqani Terrorists in Afghanistan war; America anrgry.)

पाकिस्तान हा विश्वासघातकी देश असल्याची जाणीव अमेरिकेला झाल्याने बायडेन सरकारने आंतरराष्ट्रीय हितसंबंधांचा आढावा घेण्याचे ठरविले आहे. पाकिस्तानने एकीकडे अफगाणिस्तान सरकारला मदत करत असल्याचे भासविले आणि दुसरीकडे तालिबानी दहशतवाद्यांना पोसले. यामुळे अमेरिकी सरकार पाकिस्तानवर नाराज झाले असून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी ही माहिती दिली आहे. 

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये काही खासदारांनी पाकिस्तानला एवढी मदत देऊ नका, अद्ययावत शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने देऊ नका, ती दहशतवादाविरोधात न वापरता भारताविरोधात कारवायांसाठी वापरली जातात असे अनेक सदस्यांनी सांगितले होते. परंतू अमेरिकी नेतृत्व त्याकडे दुर्लक्ष करत होते. आता त्यांनाच मोठी अद्दल पाकिस्तानने घडविल्याने पाकिस्तानशी संबंधांचा आढावा घेण्य़ात येणार आहे. संसदेत ब्लिंकन यांनी ही माहिती दिल्यावर अन्य सदस्यांनीही पाकिस्ताविरोधात वक्तव्ये केली. 

अमेरिकेच्या खासदारांनी पाकिस्तानवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच अनेकांनी पाकिस्तानला दिलेला गैर नाटो सहकारी हा दर्जा काढून घेण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानने अमेरिकेच्या पाठीत सुरा खुपसला आहे. अफगाणिस्तानमध्ये अनेक अमेरीकी सैनिक मारले गेले. पाकिस्तान अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर घेत राहिला आणि अमेरिकेविरोधात कारस्थाने रचल्याचा आरोप केला आहे. 

Web Title: Pakistan played double game with America; Helping Taliban in Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.