शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जरा 'त्या' भारतीयांकडून शिका! भरबैठकीत पाकिस्तानी पंतप्रधान भडकले; अधिकाऱ्यांवर कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 12:33 IST

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये भारतीय अधिकाऱ्यांची स्तुती; पाकिस्तानी राजदूतांची खरडपट्टी

इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. भारतीय राजदूतांच्या कार्यशैलीची प्रशंसा करत खान यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सुनावलं. भारताच्या राजदूतांकडून काहीतरी शिका, अशा शब्दांत खान यांनी अधिकाऱ्यांना झापलं. यावेळी खान यांनी पाकिस्तानच्या राजदूतांच्या कार्यपद्धतीबद्दल नापसंती व्यक्त केली. भारतीय दूतावासातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग अधिक सक्रिय असतो. त्यांच्याकडून परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना उत्तम सेवा दिली जाते, अशा शब्दांत खान यांनी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचं तोंडभरून कौतुक केलं. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, खान यांनी जगभरातील देशांमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या राजदूतांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. पाकिस्तानचे राजदूत त्यांच्या कामाबद्दल उदासीन असतात. त्यामुळे विशेष करून मध्य पूर्वेतील सेवांवर परिणाम होतो, असं म्हणत खान यांनी नाराजी व्यक्त केली.दिवसा कोरोना जागृती, रात्री दारूची तस्करी; भाजप कार्यकर्ते वापरत असलेली गाडी जप्त'सौदी अरेबियामध्ये असलेल्या दूतावासातील काही कर्मचारी काम करत नसल्याची माहिती मला मिळाली आहे. कुवेतमध्ये असलेल्या नाड्राच्या (नॅशनल डेटाबेस अँड रजिस्ट्रेशन अथॉरटी) कार्यालयात तैनात असलेले कर्मचारी मार्गदर्शन करण्याऐवजी हफ्ते खातात. इथला एक अधिकारी बोगस कागदपत्रं तयार करण्याचं काम करतो असंदेखील मला समजलं आहे. हे ऐकून मला धक्काच बसला,' असं खान व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये म्हणाले.भारतीय राजदूत कसे काम करतात ते पाहा. त्यांचा आदर्श घ्या, अशा शब्दांत खान यांनी भारतीय अधिकाऱ्यांचं कौतुक केलं. भारतीय राजदूत आपल्या नागरिकांना अतिशय उत्तम दर्जाची सेवा देतात. इतकंच नव्हे, तर त्यांच्या देशात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांच्याकडून काहीतरी शिका, असा सल्ला खान यांनी त्यांच्या राजदूतांना दिला.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान