शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 20:43 IST

भारत सरकारने इस्रायलमध्ये असलेल्या आणि मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना परत आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने इस्रायलमध्ये असलेल्या आणि मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना परत आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एक पोस्ट करत ही माहिती दिली.

मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, "इस्रायल आणि इराणमधील सध्याच्या घडामोडी पाहता, भारत सरकारने इस्रायलमधून परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याची व्यवस्था केली आहे. त्यांना इस्रायलमधून भूमार्गाने प्रवास करून सीमेपर्यंत आणले जाईल आणि त्यानंतर विमानाने भारतात पोहोचवले जाईल."

तात्काळ नोंदणी करा!इस्रायलमधून परत येण्यास इच्छुक असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तेल अवीवमधील भारतीय दूतावासाकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी https://www.indembassyisrael.gov.in/indian_national_reg या लिंकवर जाऊन लगेच नोंदणी करावी. तसेच, कोणत्याही मदतीसाठी, तेल अवीवमधील भारतीय दूतावासाच्या २४/७ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येणार आहे. यासाठी देखील माहिती जारी करण्यात आली आहे.

दूरध्वनी क्रमांक: +972 54-7520711, +972 54-3278392ईमेल: cons1.telaviv@mea.gov.in

सुरक्षा सर्वोच्च प्राधान्यभारत सरकार परदेशातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. "सरकार परिस्थितीवर सतत बारकाईने लक्ष ठेवून आहे. दूतावास तेथील भारतीय समुदायाच्या संपर्कात असून, सर्वतोपरी मदत देण्यासाठी कटिबद्ध आहे," असे मंत्रालयाने सांगितले.

यापूर्वी, इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमधून भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत पहिले विमान येरेव्हान, आर्मेनिया येथून ११० भारतीय नागरिकांना घेऊन गुरुवारी दिल्लीत दाखल झाले आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धIndiaभारत