शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भारतीय राजदूताला आयएसआयच्या धमक्या; 'ते' दोघे पकडले गेल्यानं पाकिस्तानचा जळफळाट?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 10:12 PM

भारतीय राजदूताच्या घराबाहेर आयएसआयकडून माणसं तैनात

इस्लामाबाद: एकीकडे संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे पाकिस्तानभारताविरोधात वेगळीच कटकारस्थानं रचत आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी दुतावासात काम करणारे दोन अधिकारी हेरगिरी करताना रंगेहात पकडले गेले. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांनी ताब्यात घेतलं. त्यांना तातडीनं देशातून बाहेर काढण्यात आलं. यामुळे चरफडत असलेल्या पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं आता इस्लामाबादमधील भारतीय राजदूताला त्रास देण्यास सुरुवात केली आहे.इस्लामाबादमध्ये वास्तव्यास असलेले भारताचे वरिष्ठ राजदूत गौरव अहुवालिया यांच्या घराबाहेर आयएसआयनं कार आणि दुचाकीसह काही जणांना तैनात केलं आहे. त्यांच्याकडून अहुवालिया यांना धमक्या दिल्या जात आहेत. सर्व देशांच्या राजदूतांना व्हिएन्ना कराराच्या अंतर्गत सुरक्षा दिली जाते. मात्र इस्लामाबादमधील अतिसुरक्षित क्षेत्रात राहणाऱ्या अहुवालिया यांना धमक्या दिल्या जात असल्यानं भारतीय राजदूतांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये सेवा बजावणारे भारतीय राजदूत गौरव अहुवालिया यांनी याआधीही त्रास देण्यात आला आहे. कित्येकदा आयएसआयच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकी आणि कारच्या माध्यमातून अहुवालिया यांचा पाठलाग केला आहे. याबद्दल इस्लामाबादमधील भारतीय दुतावासानं चिंता व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतल्या पाकिस्तानी दूतावासात काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना (आबिद हुसेन आणि मोहम्मद ताहिर) भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी हेरगिरी करताना रंगेहात पकडलं. त्यानंतर त्यांना देशातून बाहेर काढण्यात आलं. याचाच बदला घेण्यासाठी आयएसआय भारतीय राजदूताला त्रास देत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान मोदींकडून मास्टरस्ट्रोक्सचा चौकार; भारताच्या हालचाली पाहून चिनी ड्रॅगन हैराणचीनला धडा शिकवण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलियाचा मास्टरप्लान; समुद्रात ड्रॅगनला भारी पडणारजोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमानंकोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार

टॅग्स :Pakistanपाकिस्तानISIआयएसआयIndiaभारत