Marathi News : पुणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असतानाच दुसरीकडे शालेय पातळीवर मराठी भाषेविषयी वाढती अनास्था असल्याचे चित्र शुक्रवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात दिसले. दहावीत मराठी विषयात एकूण ९४,५४४ विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यापैकी तब्बल ८० हजार ८०३ विद्यार्थी हे प्रथम मराठी भाषा घेतलेले आहेत.
दहावीचा निकाल यंदा ९२.०९ टक्के लागला. गतवर्षी ही टक्केवारी ९४.१० हाेती. विशेष म्हणजे यंदा बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीचा निकालही सरासरी २ टक्क्यांनी घसरला आहे. यात कोकणचा निकाल सर्वाधिक तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
कारणे काय? : शिक्षणतज्ज्ञांच्या मते, नवीन 'कृतीपत्रिका' आराखडा, शुद्धलेखनातील चुका आणि वाचनाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे मराठी विषयातील गुण कमी होत आहेत किंवा ते अनुत्तीर्ण होत आहेत.
उपाय काय? : मराठी विषयाच्या अध्यापन पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शिवाय मराठीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे गरजेचे आहे.
मराठीबद्दलची ही अनास्था पाहा,
५ वर्षांतील सर्वात कमी निकाल
वर्ष नापास निकाल
२०२६ ९४,५४४ ९२.५७%
२०२५ ३८,४३७ ९४.१३%
२०२४ ३८,४३७ ९६.४९%
२०२३ ९४,०००+ ९३.८३%
२०२२ ५९,०००+ ९६.९४%
प्रथम भाषा म्हणून मराठीचा पर्याय १५,४२,४७२ पैकी १०,८७,६९९ विद्यार्थ्यांनी निवडला. त्यापैकी १०,०६,८९६ विद्यार्थी मराठीत उत्तीर्ण झाले. याचाच अर्थ ८०,८०३ विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत.
प्रथम भाषा इंग्रजी निवडलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८८% लागला. दुसरी भाषा म्हणून इंग्रजी निवडलेले ९२.११% विद्यार्थी पास झाले.
प्रथम भाषा
भाषा निकाल (%)
मराठी ९२.५७
इंग्रजी ९७.८८
हिंदी ८९.६९
उर्दू ९५.४७
गुजराती ९४.२०
कन्नड ९१.८५
तमिळ ९६.७३
तेलुगू १००
सिंधी १००
बंगाली १००
द्वितीय, तृतीय भाषेचा निकाल
भाषा निकाल (%)
मराठी ९६.६८
हिंदी ९२.७५
इंग्रजी ९२.११
उर्दू २५
गुजराती १००
तमिळ १००
संस्कृत ९९.२१
पाली ९९.६२
अरबी ९९.५९
दुसरी भाषा म्हणून मराठी भाषेची परीक्षा दिलेल्या ४,१३,९१७ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याचाच अर्थ दुसरी भाषा म्हणून मराठी भाषेची निवड केलेल्यांपैकी १३ हजार ७४१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
विभागनिहाय निकाल (%)
कोकण ९७.६२
कोल्हापूर ९५.४७
मुंबई ९४.९७
पुणे ९४.२४
नाशिक ९०.५३
अमरावती ९०.५०
नागपूर ८९.०७
लातूर ८८.४२
छ. संभाजीनगर ८८.४१
Web Summary : Over 94,000 students failed Marathi in class 10, with 80,000 having it as their first language. Overall pass percentage dipped to 92.09%. Experts cite curriculum changes and declining reading habits for the poor results.
Web Summary : कक्षा 10 में 94,000 से अधिक छात्र मराठी में फेल हो गए, जिनमें से 80,000 की यह पहली भाषा थी। कुल उत्तीर्ण प्रतिशत 92.09% तक गिर गया। विशेषज्ञों ने खराब परिणामों के लिए पाठ्यक्रम परिवर्तन और पढ़ने की आदतों में गिरावट को जिम्मेदार ठहराया।