शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
4
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
5
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
6
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
7
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
8
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
9
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
10
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
11
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
12
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
13
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
14
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
15
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
16
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
17
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
18
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
19
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
20
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
Daily Top 2Weekly Top 5

वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 06:48 IST

वृद्धत्व, म्हातारपण आलं की अनेक जण अस्वस्थ होतात. आपल्या आयुष्याचे आता थोडेच दिवस राहिलेत किंवा मला जे काही करायचं होतं, ते आता करून झालं, असं म्हणत पुढचं आयुष्य कसंबसं पुढे ढकलतात.

Marathi News : वृद्धत्व, म्हातारपण आलं की अनेक जण अस्वस्थ होतात. आपल्या आयुष्याचे आता थोडेच दिवस राहिलेत किंवा मला जे काही करायचं होतं, ते आता करून झालं, असं म्हणत पुढचं आयुष्य कसंबसं पुढे ढकलतात. काही जणांचा उत्साह मात्र कोणत्याच वयात कमी होत नाही. उलट आपल्या तरुणपणी आणि पूर्वायुष्यात आपल्याला जे जमलं नाही, ते आता करायचं आणि पुढचं आयुष्य आनंदात, मस्तीत जगायचं या ध्येयानं ते कामाला लागतात.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका

ब्रिटनमधल्या अशाच उत्साही गिल आजी. सध्या त्या ७४ वर्षांच्या आहेत आणि तब्बल ७२ देश त्यांचे फिरून झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सगळा प्रवास त्यांनी एकटीनं केला आहे. सध्या त्या चीनमध्ये आहेत आणि चीनमधील लोकांनी केलेल्या आदरातिथ्यानं, मदतीनं आणि लोकांच्या आपुलकीनं त्या अतिशय भारावून गेल्या आहेत.

गिल आजींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जग पाहण्याचा ध्यास आहे, मात्र ज्या देशात त्या जातात, तिथे केवळ पर्यटक म्हणून त्या जात नाहीत, तर तिथे स्वयंसेवक म्हणूनही काम करतात. तिथल्या सामाजिक उपक्रमांत भाग घेतात. लोकांना मदत, मार्गदर्शन करतात. आपल्या परीनं जे-जे काही करणं त्यांना शक्य असतं, त्या साऱ्या गोष्टी त्या करतात. त्यामुळे या आजी जिथे जातात तिथे चांगल्याच प्रसिद्ध होतात. विशेषत: तरुणाईशी त्यांचं चांगलंच सख्य जमतं.

आपल्या प्रवासादरम्यान चीनमध्ये असताना त्यांची भेट झाली शियाओ यू (Xiao Yue) नावाच्या एका चिनी विद्यार्थिनीशी. या दोघींची ओळख आधी थायलंडमधील फुकेतमध्ये स्वयंसेवा करताना झाली होती. नंतर या दोघींचाही ई-मेलद्वारे संपर्क सुरू राहिला. जेव्हा झियाओला कळलं की गिल आजी चीनमध्ये येणार आहेत आणि त्यांचा पुढचा मुक्काम गुइलिन येथे आहे, तेव्हा ती खास त्यांना भेटण्यासाठी आली. तिनं दोन दिवस गिल आजींना उत्तमोत्तम स्थानिक पदार्थांची चव चाखवली आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळंही फिरवून आणली.

गिल आजींसोबत फिरत असताना, एक गोष्ट झियाओच्या लक्षात आली.. आजींना सर्वाधिक भीती वाटायची ती म्हणजे आपल्या फोनची बॅटरी संपली तर?.. त्यामुळे मोबाइलचा वापर त्या अतिशय मर्यादित करत किंवा मोबाइल सरळ बंदच ठेवत. चीनमधील डिजिटल पेमेंट्स, टॅक्सी अप्स किंवा ऑनलाइन व्यवस्थाही त्यांना सहज जमत नव्हती. झियाओला काळजी वाटली. तिनं सोशल मीडियावर एक साधी, पण भावस्पर्शी पोस्ट लिहिली.. ब्रिटनमधल्या ७४ वर्षांच्या गिल आजी एकटीनं जगप्रवास करीत आहेत. सध्या त्या आपल्याकडे, चीनमध्ये आल्या आहेत. इथे असताना तुमची जर या आजींशी भेट झाली तर, प्लीज त्यांना मदत करा !

या पोस्टमुळे चीनमध्ये सुरू झाली मानवतेची एक अनोखी साखळी! गिल आजी चीनमध्ये जिथे-जिथे गेल्या, त्या प्रत्येक ठिकाणी लोक स्वत:हून पुढे आले. गिल आजींसाठी ते गाइड बनले आणि त्यांनी आजींना सर्वतोपरी मदत केली.

या वयातही गिल आजी तियानमेन पर्वतावरील ९९९ पायऱ्या चढल्याचं अनेकांनी कौतुक केलं. या प्रवासात अनेक तरुण पर्यटक दमले, पण गिल आजी मात्र पुढेच चालत होत्या. त्यांनीही अभिमानानं सांगितलं, आमच्या गटातील फक्त दोन जण वरपर्यंत चालत गेले, त्यातली एक मी होते !

गिल आजींच्या एका वाक्यानं हजारो लोकांच्या मनाला स्पर्श केला. या वयात तुम्ही इतकं का फिरताहात, असं विचारल्यावर त्या सांगतात, मी फक्त आयुष्याचा आनंद घेते आहे! त्यांचं  हे वाक्य सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं. गिल यांचा प्रवास केवळ पर्यटन नाही; जगात अजूनही विश्वास, प्रेम आणि माणुसकी असल्याचा तो सुंदर पुरावा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 74-year-old Brit travels 72 countries solo: 'Granny Gill'!

Web Summary : 74-year-old 'Granny' Gill, a Brit, has travelled 72 countries solo. Volunteering abroad, she connected with a Chinese student, who helped her in China. A social media post led to overwhelming support, proving humanity still exists.