शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
4
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
5
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
6
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
7
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
8
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
9
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
10
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
11
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
12
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
13
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
14
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
15
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
16
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
17
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
18
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
19
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
20
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 06:39 IST

बीसीसीआयने एक खरमरीत नियमावली आयपीएल फ्रँचाइजींना पाठवली आहे. नेमके काय बिघडले आहे? या बेशिस्तीचे परिणाम काय होऊ शकतील?

मेघना ढोके

संपादक, लोकमत सखी डॉट कॉम

Marathi News :  अतिप्रचंड पैसा आणि अमाप लोकप्रियता लाभलेल्या माणसांना कुणी शिस्त आणि सभ्य वर्तनाचे धडे द्यायला लागलंच तर त्याला ‘संकेत’ यापेक्षा जास्त महत्त्व न देण्याची एक नवीन अलिखित रीत आता सर्वत्रच तयार होते. मग क्रिकेटपटू तरी त्याला अपवाद कसे असतील? आक्रमकपणा देहबोलीतून नाही तर केवळ कामगिरीतून दाखवण्याचा तेंडुलकर-द्रविड काळ आता सरला. आता जो जितका आक्रमक, जितका बडबोला, जितका समाजमाध्यमस्नेही तितका चर्चेत असा एक नवा पायंडा पडत आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये मात्र तो इतका ठळक झाला, की बीसीसीआयला एक मोठी शिस्त नियमावली दहाच्या दहा आयपीएल फ्रँचाइजींना पाठवावी लागली. देवाजीत सैकियांनी खरमरीत पत्र पाठवून ‘खबरदार, नियम मोडाल तर परिणाम वाईट होतील’, असा खडसावून दमच भरला आहे. नेमकं झालं काय बीसीसीआयला इतकं चिडायला?

तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?

काही ठळक कारणं जगजाहीर दिसली. काही बीसीसीआयच्या ॲण्टी करप्शन विभागाने शोधली.. सगळ्यात मोठं कारण?- खेळाडूंच्या ‘मैत्रिणींचा’ मुक्त वावर ! खेळाडूंनी कुणाला ‘डेट’ करावं, लग्नाशिवाय एकत्र राहावं, उघडपणे प्रेम व्यक्त करावं हे त्यांचं खासगी जगणं झालं. त्यात ढवळाढवळ करण्याचा हक्क बीसीसीआयला नाही, माध्यमांना आणि चाहत्यांनाही नाही. पण यावेळी मात्र संघांच्या ड्रेसिंग रूमपासून हॉटेल आणि थेट संघ बैठकांपर्यंत कुठेही वावरणाऱ्या ‘गर्लफ्रेंड्स’ बीसीसीआयच्या ‘नजरे’त आल्या. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, व्यवस्थापकीय सहकारी, संघमालक यांच्या जवळची माणसं सर्वत्र खुलेआम संचार करू लागली. नियम मोडले गेले. नको तिथे नको त्या माणसांची गर्दी वाढू लागल्यावर त्यातून मॅच फिक्सिंग, हनी ट्रॅप, खेळाडूंची सुरक्षितता, बेकायदा आर्थिक व्यवहार या साऱ्याला मोकळं रान मिळेल असं निदर्शनास आल्यानं बीसीसीआयने कडक शिस्तीचा बडगा उगारला.

यावर्षीच्या आयपीएलमध्ये तसं खूप काही ‘व्हायरल’ झालं. राजस्थान रॉयलचा कप्तान रियान पराग वेपिंग करताना दिसला. मॅच सुरू असताना ड्रेसिंग रूममध्ये बसून वेपिंग करतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. वेपिंगवर भारतात बंदी असल्यानं तो गंभीर गुन्हा आहे; पण परागला किरकोळ २५ टक्के फी कपात आणि एक डीमेरिट पॉइण्ट असा दंड झाला. त्याच संघाचा एक व्यवस्थापक स्मार्ट फोन वापरताना दिसला. युजवेंद्र चहल विमान प्रवासात वेपिंग करताना दिसला. अनेक खेळाडूंच्या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर असलेल्या गर्लफ्रेंण्ड्स आपापले फॉलोअर्स वाढवण्यासाठी संघ-बैठकांच्या ठिकाणाहून रिल करताना दिसल्या.

यंदाच्या आयपीएलमध्ये क्रिकेटची चर्चा कमी आणि क्रिकेटबाह्य गोष्टींची, खेळाडूंच्या वर्तनाचीच चर्चा जास्त सुरू आहे. शिस्तीचं सुटलेलं भान आणि पैशाची मस्ती असलेली देहबोली हे या आयपीएलचं एक अशोभनीय वैशिष्ट्य म्हणायला हवं. एकीकडे अनेक खेळाडूंना दुखापतींनी छळलं, त्यांनी माघार घेतली. दुसरीकडे पाटा खेळपट्ट्यांमुळे बॉलर नावाच्या खेळाडूला काही महत्त्वच उरू नये इतकी त्याची पिटाई झाली. काही अत्यंत एकारलेले रटाळ सामने झाले, क्रिकेटचा थरार कमी झाला. आणि दुसरीकडे काही संघमालकांचं वर्तन, मूड्स, त्यांचं खेळाडूंशी असलेलं वर्तन, ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंना ‘संदेश’ देणं,  संघातलं राजकारण आणि दुफळ्या हे इतकं उघड झालं की शेवटी टीव्हीवरची प्रेक्षकसंख्या कमी होण्याचं संकट दिसू लागलं. यासाऱ्यात बीसीसीआयने हा शिस्तीचा बडगा उचललेला दिसतो. तो इतका टोकदार आहे की आता यापुढे खेळाडूंना भेटायला कोण कोण येतं याची रितसर लेखी परवानगी संघ व्यवस्थापकाकडून घ्यावी लागेल, एक नोंदवही ठेवून त्यात सगळ्या भेटींचे नाव तारीखवार तपशील लिहावे लागतील.

तब्बल दीड महिना चालणारी ही स्पर्धा, १० संघ, १३ ठिकाणी देशभर होणारे सामने हे सारं नियोजन अर्थात सोपं नसतं, एक मोठी यंत्रणा त्यापाठीमागे राबते. महागडी तिकिटं खरेदी करून सामने पहायला येणारी प्रेक्षकसंख्याही मोठी आहे. आयपीएलने आजवर लहान शहरातले अत्यंत गुणी खेळाडू घडवले, त्यांना संधी दिली, क्रिकेटचा थरार अनुभवू दिला आणि लोकप्रियतेसह लोकाश्रयही कमावला. पण आयपीएलला एकोणिसावं वर्ष लागता लागता काही बेशिस्त गोष्टी घडताना दिसू लागल्या, त्याला वेळीच  अटकाव करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न पैशाच्या उर्मट सत्तेपुढे कितपत यशस्वी होतो ते पहायचं!

English
हिंदी सारांश
Web Title : IPL's Indiscipline: BCCI, Players, and Girlfriends Under Scrutiny Now!

Web Summary : BCCI cracks down on IPL's growing indiscipline, fueled by player behavior and girlfriend access. Rule violations, potential match-fixing risks, and declining viewership prompted strict measures. Permits now required for visitors.
टॅग्स :IPLआयपीएल २०२४