"अमेरिकन गुप्तहेरांची माहिती द्या; १,००,००० डॉलर्सचं बक्षीस मिळवा"; इराकी गटांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 10:39 IST2026-03-14T10:39:06+5:302026-03-14T10:39:49+5:30
Iraq vs US Intelligence, Iran Israel War Updates: घोषणेमुळे प्रदेशात तैनात अमेरिकन सैन्य, दूतावासातील कर्मचाऱ्यांसाठी धोका आणखी वाढला

"अमेरिकन गुप्तहेरांची माहिती द्या; १,००,००० डॉलर्सचं बक्षीस मिळवा"; इराकी गटांची मोठी घोषणा
Iraq vs US Intelligence, Iran Israel War Updates: पश्चिम आशियातील सध्याच्या तणावादरम्यान, इराकचा सशस्त्र गट इस्लामिक रेझिस्टन्सने अमेरिकन लष्करी आणि गुप्तचर कर्मचाऱ्यांबद्दल एक खळबळजनक घोषणा केली आहे. इराक आणि आसपासच्या भागात कार्यरत असलेल्या अमेरिकन लष्करी, हेर आणि गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांबद्दल अचूक माहिती देणाऱ्यांना इराकी गटांनी मोठे बक्षीस जाहीर केले आहे.
जम्बो बक्षीसाची घोषणा
शुक्रवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात, प्रतिकार गटांनी म्हटले आहे की उच्च-स्तरीय अमेरिकन लष्करी किंवा गुप्तचर अधिकाऱ्यांची ओळख किंवा ठावठिकाणा याबद्दल अचूक माहिती देणाऱ्यांना १५० दशलक्ष इराकी दिनार म्हणजेच अंदाजे १,१४,५०० डॉलर्स किंवा भारतीय चलनात ९.५ दशलक्ष रुपयांपेक्षा जास्तचे बक्षीस मिळेल. हे बक्षीस इराकी नागरिक आणि तेथे राहणाऱ्या परदेशी रहिवाशांना लागू आहे.
निवेदनात काय?
जमिनीवर युद्ध हालचाली वाढल्यामुळे व इतरांच्या ताकदीमुळे अमेरिकन सुरक्षा पर्याय मर्यादित झाले, आहेत असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या इराकी गटांच्या मते, अमेरिकन अधिकाऱ्यांना आता पर्यायी नागरी ठिकाणांचा अवलंब करावा लागत आहे, जे ते सुरक्षित मानतात. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. माहिती मिळवण्यासाठी सुरक्षित मार्ग स्थापित केले गेले आहेत यावर रेझिस्टन्सने भर दिला आहे.
युद्धाचा तणाव शिगेला
या गटांनी इराकमध्ये अमेरिकन हवाई दलाचे इंधन भरणारे विमान (KC-135) पाडल्याचा दावा केल्यानंतर एका दिवसातच ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व सहा क्रू सदस्य ठार झाले. या नवीन बक्षीसाच्या घोषणेमुळे या प्रदेशात तैनात असलेल्या अमेरिकन सैन्य आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांसाठी धोका आणखी वाढला आहे.