इराणचा मोठा गौप्यस्फोट: अमेरिकन हल्ल्यात सर्व अणुकेंद्रे उद्ध्वस्त; युरेनियमचे साठे ढिगाऱ्याखाली दाबले गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 09:00 IST2026-03-16T08:59:24+5:302026-03-16T09:00:44+5:30

तेहरान/वॉशिंग्टन: अमेरिकेने केलेल्या भीषण बॉम्बफेकीत इराणची अणुकेंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तेथील आण्विक साहित्य ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचा खळबळजनक दावा ...

Iran's big secret revelation: All nuclear plants destroyed in American attack; Uranium reserves buried under rubble | इराणचा मोठा गौप्यस्फोट: अमेरिकन हल्ल्यात सर्व अणुकेंद्रे उद्ध्वस्त; युरेनियमचे साठे ढिगाऱ्याखाली दाबले गेले

इराणचा मोठा गौप्यस्फोट: अमेरिकन हल्ल्यात सर्व अणुकेंद्रे उद्ध्वस्त; युरेनियमचे साठे ढिगाऱ्याखाली दाबले गेले

तेहरान/वॉशिंग्टन: अमेरिकेने केलेल्या भीषण बॉम्बफेकीत इराणची अणुकेंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तेथील आण्विक साहित्य ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचा खळबळजनक दावा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण आशिया खंडात रेडिएशनचा (किरणोत्सर्ग) धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अराघची यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अमेरिकन हवाई हल्ल्यांमुळे इराणच्या महत्त्वाच्या अणू प्रकल्पांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या सर्व काही ढिगाऱ्याखाली आहे. आमचे आण्विक साहित्य गाडले गेले आहे,असे सांगतानाच त्यांनी स्पष्ट केले की, इतके नुकसान सोसूनही इराण कोणत्याही परिस्थितीत युद्धविराम करणार नाही. उलट, इराणने अमेरिकेला आणखी मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे.

हे युरेनियम आताच बाहेर काढण्याचा सरकारचा इरादा नाही. भविष्यात ते जर बाहेर काढण्याचा निर्णय झालाच तर आंतरराष्ट्रीय आण्विक संस्थेच्या निरीक्षणाखालीच बाहेर काढण्यात येईल. आम्ही अमेरिकेसोबत चर्चा करत असताना युरेनियमचा समृद्ध साठा ६० टक्क्यांपेक्षा खाली आणण्याचा शब्द दिला होता. हा आकडा अत्यंत आश्वासक होता, यामुळे इराण अण्वस्त्र तयार करणार नाही, हे स्पष्ट होत होते. परंतू, तरीही अमेरिकेने इस्रायलच्या साथीने आमच्यावर हल्ला केला, असा आरोप अराघची यांनी केला आहे. 

रेडिएशनचा धोका वाढला?
अणुकेंद्रावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात रेडिएशन पसरण्याची दाट शक्यता आहे. जर हे आण्विक अवशेष वेळीच सुरक्षित केले नाहीत, तर त्याचा परिणाम केवळ इराणवरच नाही, तर शेजारील देशांवरही होऊ शकतो. अमेरिकेने मात्र इराणचा हा दावा फेटाळून लावत म्हटले आहे की, त्यांनी केवळ लष्करी तळांनाच लक्ष्य केले आहे.

संघर्षाची तीव्रता वाढली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आधीच इशारा दिला होता की, इराणच्या आण्विक क्षमतेला अमेरिका पूर्णपणे संपवून टाकेल. अणुकेंद्रावर झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी इराण आता इस्रायल आणि अमेरिकन तळांवर 'सेज्जिल' आणि इतर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर अधिक वेगाने करण्याची शक्यता आहे. 

Web Title : ईरान का दावा: अमेरिकी हमले में परमाणु केंद्र नष्ट, यूरेनियम भंडार दबे

Web Summary : ईरान का आरोप है कि अमेरिकी बमबारी ने उसके परमाणु केंद्रों को नष्ट कर दिया, यूरेनियम दब गया। विकिरण का खतरा मंडरा रहा है, पड़ोसी देशों पर असर। ईरान बदला लेने का संकल्प लेता है।

Web Title : Iran Claims US Attack Destroyed Nuclear Sites, Uranium Stockpiles Buried

Web Summary : Iran alleges a US bombing destroyed its nuclear sites, burying uranium. Radiation risk looms, impacting neighboring countries. Iran vows retaliation despite significant damage and denies willingness to negotiate with the US.