“कोणतीही कमतरता नाही, खूप क्षेपणास्त्रे तयार होतायत”; इराणचा इस्रायल-अमेरिकेला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:31 IST2026-03-20T13:30:02+5:302026-03-20T13:31:24+5:30

America Israel Iran War: वेगाने आणि मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे बनवली जात आहेत, असे इराणने म्हटले आहे.

iran direct warning to israel and america that there is no shortage many missiles are being produced | “कोणतीही कमतरता नाही, खूप क्षेपणास्त्रे तयार होतायत”; इराणचा इस्रायल-अमेरिकेला थेट इशारा

“कोणतीही कमतरता नाही, खूप क्षेपणास्त्रे तयार होतायत”; इराणचा इस्रायल-अमेरिकेला थेट इशारा

America Israel Iran War: अमेरिकाइस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध अद्यापही सुरूच आहे. कोणताही देश माघार घेण्यास तयार नाही. या युद्धामुळे जगातील अनेक देशांना मोठा फटका बसला असून, अनेक बाबतीत नुकसान सोसावे लागत आहे. भारतालाही या युद्धाची झळ बसली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाबाबत अनेक दावे केले आहेत. पंरतु, त्यापैकी बहुतांश दावे फोल ठरत असल्याचे पाहायला मिळत आहेत. 

अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धात विजय मिळवल्याचा दावा करत इराणचे नेतृत्व आता संपले असल्याचा दावा केला होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही युद्धात विजय मिळवल्याचा दावा केला होता. तसेच आता कोणतीही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता शिल्लक राहिलेली नाही, असेही म्हटले होते. यातच क्षेपणास्त्र निर्मिती क्षमता नष्ट केल्याच्या अमेरिका आणि इस्रायलच्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठा इशारा दिला आहे. 

क्षेपणास्त्रांची कोणतीही कमतरता नाही

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने असा दावा केला आहे की, युद्धाच्या काळातही क्षेपणास्त्रांचे उत्पादन अव्याहतपणे सुरू आहे. त्यांच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही. क्षेपणास्त्रांचे उत्पादन वेगाने होत आहे. याकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना दिलेले प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे.

दरम्यान, इस्रायलने इराणच्या पार्स गॅस क्षेत्रावर हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारपासून बहरीनपर्यंतच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर प्रतिहल्ले केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या गॅस क्षेत्रावरील हल्ल्याची माहिती नसल्याचे सांगत, नेतान्याहू यांना याची पुनरावृत्ती न करण्याचे आवाहन केले होते.

 

Web Title : ईरान की इस्राइल, अमेरिका को चेतावनी: 'कोई कमी नहीं, कई मिसाइलें बन रही हैं'

Web Summary : जारी तनाव के बीच, ईरान ने इस्राइल और अमेरिका द्वारा कम क्षमताओं के दावों को खारिज करते हुए अपने मिसाइल उत्पादन को मजबूत बताया। यह घोषणा गैस और तेल सुविधाओं पर कथित हमलों के बाद हुई, जिससे क्षेत्रीय संघर्ष बढ़ गया।

Web Title : Iran Warns Israel, US: 'No Shortage, Many Missiles Being Produced'

Web Summary : Amid ongoing tensions, Iran asserts its missile production continues robustly, dismissing claims of depleted capabilities by Israel and the US. This declaration follows alleged attacks on gas and oil facilities, escalating regional conflict.