इराणचे अमेरिकेला आव्हान; निर्बंध हटवले तरच करू चर्चा, जिनेव्हात चर्चेची तयारी सुरू असताना इराणची अरेरावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 08:26 IST2026-02-17T08:24:58+5:302026-02-17T08:26:48+5:30

अमेरिकेची मोठ्या लष्करी कारवाईची तयारी सुरू; दोन्ही देशांतील तणावात वाढ

Iran challenges America; Will talk only if sanctions are lifted, Iran's anger as preparations for talks in Geneva continue | इराणचे अमेरिकेला आव्हान; निर्बंध हटवले तरच करू चर्चा, जिनेव्हात चर्चेची तयारी सुरू असताना इराणची अरेरावी

इराणचे अमेरिकेला आव्हान; निर्बंध हटवले तरच करू चर्चा, जिनेव्हात चर्चेची तयारी सुरू असताना इराणची अरेरावी

तेहरान :इराणशी आण्विक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जिनेव्हात तयारी सुरू असताना, अमेरिका-इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. अमेरिकेने आर्थिक निर्बंध हटवले, तरच आण्विक करारावर चर्चा होईल, असे आव्हान इराणने दिले असून, अमेरिकेने अरबी समुद्रात दाखल युद्धक विमानवाहू जहाजावर लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे. 

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची अमेरिकेशी दुसऱ्या फेरीची चर्चा करण्यासाठी जिनेव्हात दाखल झाले आहेत. कोणत्याही धमक्यांना न जुमानता किंवा कुणापुढे शरणागती न पत्करता नि:पक्ष व समान न्यायाने चर्चा होणार असेल, तर अशा चर्चेसाठी आपण जिनेव्हात आलो असल्याचे अराघची यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

तालिबानही सरसावले

अमेरिकेने इराणवर हल्ला केलाच, तर शेजारी देश म्हणून अफगाणिस्तान आपल्या पूर्ण क्षमतेने इराणच्या पाठीशी मदतीसाठी उभा राहील, असे अफगाण तालिबानने जाहीर केले आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी एका पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली.

यूएसस-अब्राहम लिंकनवर तयारी, लष्करी सराव सुरू

दरम्यान, इराणवर लष्करी कारवाईसाठी अमेरिकेने तयारी सुरू केली असून, अरबी समुद्रात तैनात अमेरिकेच्या यूएसएस-अब्राहम लिंकन या सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धक जहाजावर हालचाली वाढल्या आहेत. या जहाजावर अमेरिकी सैनिकांनी लष्करी सराव सुरू केला आहे.

इराणवर हल्ल्यासाठी नेतन्याहूंशी गुप्त करार

इराणशी अमेरिकेची आण्विक कराराबाबत चर्चा फिसकटली तर इराणवर हल्ला करण्यास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिरवी झेंडी दर्शवली आहे. यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतन्याहू यांच्याशी एक गुप्त करार करण्यात आल्याचे वृत्त आहे.

चर्चेत दोन्ही देशांच्या हिताच्या दृष्टीने खनिज उत्खननासह विमान खरेदीच्या मुद्द्यांचाही समावेश असल्याचा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपसंचालक हामिद घनबरी यांचा दावा.

अमेरिकेशी तणाव निर्माण झालेला असताना इराणने भयंकर अण्वस्त्र निर्मितीसाठी युरेनियमसारख्या धातूच्या शुद्धता प्रक्रियेत ६० टक्के यश मिळवल्याचे वृत्त आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी सोमवारी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांची भेट घेतली. ते मंगळवारी ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल-बुसैदी यांचीही भेट घेणार आहेत.

Web Title : ईरान की अमेरिका को चुनौती: प्रतिबंध हटाओ, तभी होगी बातचीत

Web Summary : ईरान ने अमेरिका से प्रतिबंध हटाने पर ही परमाणु वार्ता की शर्त रखी। जिनेवा में तैयारी के बीच तनाव बढ़ा। अमेरिका का सैन्य अभ्यास जारी, तालिबान का ईरान को समर्थन, संभावित संघर्ष की आशंका।

Web Title : Iran Challenges US: Lifts Sanctions for Talks, Escalating Geneva Tensions

Web Summary : Iran demands US lift sanctions for nuclear talks amid Geneva preparations. Military actions escalate, with the US preparing on USS Abraham Lincoln. Taliban supports Iran, hinting at regional conflict amid rising tensions and secret deals.