इराणचा महाविनाशक तडाखा! कुवेत, बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त; 'USS अब्राहम लिंकन'वरही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 07:18 IST2026-03-02T07:17:33+5:302026-03-02T07:18:01+5:30

Kuwait Bahrain US bases destroyed: इराण-अमेरिका संघर्षात कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. इराणने अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअरवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली असून पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला आहे.

Iran-America Israel War Update: Iran's devastating strike! American military bases in Kuwait, Bahrain destroyed; 'USS Abraham Lincoln' also hit with ballistic missiles | इराणचा महाविनाशक तडाखा! कुवेत, बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त; 'USS अब्राहम लिंकन'वरही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा

इराणचा महाविनाशक तडाखा! कुवेत, बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त; 'USS अब्राहम लिंकन'वरही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा

तेहरान/कुवेत: पश्चिम आशियातील युद्ध आता नियंत्रणाबाहेर गेले आहे. इराणने प्रतिहल्ल्यांचा धडाका लावत कुवेत आणि बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांना बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले आहे. या भीषण हल्ल्यात दोन्ही देशांतील अमेरिकन तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, अमेरिकेची सर्वात मोठी युद्धनौका 'USS अब्राहम लिंकन' वरही इराणने थेट क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

युद्धातील सर्वात मोठे धक्के
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांना उध्वस्त केले आहे. येथील धावपट्ट्या, दारूगोळा कोठारे आणि रडार यंत्रणा पूर्णपणे निकामी झाल्याची माहिती आहे. हे तळ वापरण्यालायक राहिलेले नाहीत, असा दावा इराणने केला आहे. बहरीनमध्ये नौदलाचा तळ हा अमेरिकेच्या ५ व्या मोठ्या आरामाराचे केंद्र आहे. तो नष्ट झाल्याने अमेरिकेची शक्ती कमकुवत करण्यात इराणला यश आले आहे.

एअरक्राफ्ट कॅरिअर निशाण्यावर
अमेरिकेची महाकाय युद्धनौका 'USS अब्राहम लिंकन' सध्या अरबी समुद्रात तैनात आहे. इराणने दावा केला आहे की, त्यांनी या नौकेवर ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली असून तिला युद्धाच्या मैदानातून बाहेर काढले आहे.

सूडाची कारवाई
अयातुल्ला अली खमेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने 'ऑपरेशन शहीद खामेनेई' सुरू केले आहे. अमेरिकन सैन्याच्या ३ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर आता ही आकडेवारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यांत ५६० हून अधिक अमेरिकी सैनिक मारले गेले असल्याचा दावा इराणने केला आहे.  या हल्ल्यांमुळे पर्शियन आखातातील मार्ग बंद झाले असून जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title : ईरान का हमला: अमेरिकी ठिकाने, युद्धपोत तबाह; मध्य पूर्व में तनाव बढ़ा

Web Summary : ईरान ने कुवैत और बहरीन में अमेरिकी ठिकानों पर बैलिस्टिक मिसाइलों से हमला किया, जिससे भारी नुकसान हुआ। यूएसएस अब्राहम लिंकन युद्धपोत पर भी हमला किया गया। अयातुल्ला अली खमेनेई की मौत के बाद ऑपरेशन शहीद खमेनेई शुरू किया गया, जिससे तनाव बढ़ा और तेल बाजार प्रभावित हुआ।

Web Title : Iran Strikes US Bases, Warship; Mideast Conflict Escalates

Web Summary : Iran retaliated with ballistic missiles, targeting American bases in Kuwait and Bahrain, reportedly causing significant damage. The USS Abraham Lincoln warship was also allegedly hit. Operation Shahid Khamenei was initiated after Ayatollah Ali Khamenei's death, escalating tensions and impacting global oil markets.