शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 06:13 IST

होर्मुझ सामुद्रधुनीवरून चीनच्या जहाजांना मार्ग देण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बीजिंगमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान हा महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आली. 

बीजिंग : पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवरून चीनच्या जहाजांना मार्ग देण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बीजिंगमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान हा महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आली. 

बुधवारी रात्रीपासून चीनच्या ३० जहाजांना सामुद्रधुनीतून मार्ग देण्यात आल्याचे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले.

'नवा दृष्टिकोन'

९ वर्षांनंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनचा दौरा केला. या भेटीत दोन्ही नेते द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी 'नव्या दृष्टिकोनावर' सहमत झाले. जिनपिंग यांच्या मते, हा दृष्टिकोन पुढील तीन वर्षांसाठी दोन्ही देशांच्या संबंधांना दिशा देणारा ठरेल. एकमेकांचे स्पर्धक होण्याऐवजी भागीदार म्हणून काम करायचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

'तैवान'च्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिल्यास संघर्ष अटळ 

चीन अमेरिकेला तैवानच्या मुद्द्यावर 'अतिदक्षता' बाळगण्याचा सल्ला देत जिनपिंग यांनी तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देणे हे शांततेच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असल्याचे म्हटले. जर तैवानचा प्रश्न नीट हाताळला गेला, तर संबंध स्थिर राहतील; अन्यथा दोन्ही देशांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran reopens Hormuz to Chinese ships amid US-China talks.

Web Summary : Iran has reopened the Strait of Hormuz to Chinese ships during US-China talks. 30 Chinese ships were allowed passage. Both countries agreed on a new approach to bilateral relations, but Taiwan remains a sensitive issue.
टॅग्स :chinaचीनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणWarयुद्धAmericaअमेरिका