नवी दिल्ली : मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा (एसआयआर) तिसरा टप्पा महाराष्ट्रासहित सोळा राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये येत्या ३० मेपासून टप्प्याटप्प्याने सुरू केला जाणार आहे अशी घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली.
या प्रक्रियेत ३७.६३ कोटी मतदारांचा समावेश असणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी सांगितले की एसआयआरचा उद्देश फक्त पात्र मतदारांची नोंद ठेवणे आणि अपात्र नावे वगळणे हा आहे.
महाराष्ट्रात कधी काय?
बीएलओ प्रशिक्षण : २० जून ते २९ जून
घराघरांत पडताळणी : ३० जून-२९ जुलै
प्राथमिक मतदार यादी : ५ ऑगस्ट
दावे व हरकती : ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर
अंतिम मतदार यादी : ७ ऑक्टोबर
३.४२ लाख बूथ लेव्हल एजंटचे महाराष्ट्रात (राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले) सहकार्य मिळेल.
३.९४ लाख बूथ लेव्हल ऑफिसर घरोघरी जाऊन मतदार पडताळणी करतील.
अंतिम मतदार यादी कधी येणार?
६ सप्टेंबर : ओडिशा, सिक्कीम, मिझोराम आणि मणिपूर
७ ऑक्टोबर : महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, मेघालय, झारखंड
११ नोव्हेंबर : आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, पंजाब
२ डिसेंबर : तेलंगणा, नागालँड, दादरा आणि नगर हवेली-दमण आणि दीव
२३ डिसेंबर : त्रिपुरा, उत्तराखंड
Web Summary : Maharashtra starts voter list verification (SIR) June 30. The Election Commission aims to enroll eligible voters and remove ineligible names. Door-to-door verification will be conducted, with final voter lists published October 7.
Web Summary : महाराष्ट्र में 30 जून से मतदाता सूची सत्यापन (एसआईआर) शुरू। चुनाव आयोग का लक्ष्य योग्य मतदाताओं को नामांकित करना और अयोग्य नामों को हटाना है। घर-घर सत्यापन किया जाएगा, अंतिम मतदाता सूची 7 अक्टूबर को प्रकाशित होगी।