ड्रग्ज माफिया मेंचोचा लष्कराने केला खात्मा; मेक्सिकोत हिंसाचार, २५ जवानांसह ४० हून अधिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 06:44 IST2026-02-24T06:43:23+5:302026-02-24T06:44:07+5:30

अमेरिकेच्या दबावाखातर मेक्सिकोची कारवाई केली. कार्टेलच्या सदस्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यांमध्ये मेक्सिकोच्या नॅशनल गार्डचे २५ जवान शहीद झाले आहेत.

Drug mafia Mencho killed by army; Violence in Mexico, more than 40 killed including 25 soldiers | ड्रग्ज माफिया मेंचोचा लष्कराने केला खात्मा; मेक्सिकोत हिंसाचार, २५ जवानांसह ४० हून अधिक ठार

ड्रग्ज माफिया मेंचोचा लष्कराने केला खात्मा; मेक्सिकोत हिंसाचार, २५ जवानांसह ४० हून अधिक ठार

मेक्सिको सिटी : जगातील सर्वात धोकादायक, मोस्ट वाँटेड 'जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल'चा प्रमुख नेमेसीओ ओसेगुएरा सर्वांतेस ऊर्फ 'एल मेंचो' याचा मेक्सिकन लष्कराने खात्मा केला आहे. मात्र, या कारवाईनंतर संपूर्ण मेक्सिकोत हिंसाचाराचा वणवा पेटला असून, कार्टेलच्या सदस्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यांमध्ये मेक्सिकोच्या नॅशनल गार्डचे २५ जवान शहीद झाले आहेत. देशातून बाहेर जाणारी व येणारी सर्व विमान उहाणे रद्द करण्यात आली आहेत.

मेक्सिकोचे सुरक्षा सचिव ओमार गार्सिया हार्फचनी दिलेल्या माहितीनुसार, जलिस्को राज्यात मेंचोला पकडण्यासाठी लष्कराने मोठी मोहीम राबवली होती. या चकमकीत एल मेंचो मारला गेला.

मेक्सिकोमध्ये हिंसाचाराचे तांडव

एल मैचोच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या समर्थकांनी देशातील २० राज्यांमध्ये धुमाकूळ घातला. सहा वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये २५ जवान मारले गेले.

हिंसाचारात ३० संशयित गुन्हेगार, कारागृह रक्षक, सरकारी वकिलाचाही मृत्यू झाला. हिंसाचाराचा फटका दळणवळणाला बसला आहे. विमान सेवा मर्यादित केली आहे. अनेक राज्यांमध्ये बस सेवा बंद असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीयांना इशारा

वकिलातीने मेक्सिकोतील भारतीयांसाठी हेल्पलाइन जारी केली असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

ट्रम्प प्रशासनाचा दबाव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लष्करी कारवाईसह प्रचंड टैरिफ आकारण्याची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर मेंचो मारला गेला असला तरी त्याच्या समर्थकांचा हिंसाचार पाहता हे आव्हान अजूनही कायम असल्याचे मानले जाते.

Web Title : मेक्सिको में ड्रग माफिया 'एल मेंचो' का सफाया; हिंसा भड़की।

Web Summary : मेक्सिको में सेना ने ड्रग सरगना 'एल मेंचो' को मार गिराया, जिससे हिंसा भड़क गई। कार्टेल हमलों में 25 जवान शहीद, उड़ानें रद्द। भारतीयों को सुरक्षित रहने की सलाह।

Web Title : Mexican Army eliminates drug lord 'El Mencho'; violence erupts.

Web Summary : Mexican forces killed drug kingpin 'El Mencho', sparking widespread violence. 25 guards died in Cartel attacks; flights cancelled. Indians advised safety.