शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेकडून भारताला आणखी एक धक्का?; हजारो विद्यार्थ्यांना मायदेशी परतावं लागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 09:25 IST

एच-१बी व्हिसानंतर आता विद्यार्थ्यांचे व्हिसादेखील रद्द; अमेरिकेच्या निर्णयाचा भारताला मोठा फटका

वॉशिंग्टन: कुवेतमधील जवळपास ७ ते ८ लाख भारतीयांना लवकरच देश सोडावा लागण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनादेखील माघारी परतावं लागू शकतं. आधीच एच-१बी व्हिसा रद्द करणाऱ्या अमेरिकेनं आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाईन भरत असल्यास त्यांना देशात राहण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. त्यामुळे शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना लवकरच मायदेशी परतावं लागू शकतं. 

'नॉनइमिग्रंट एफ-१ आणि एम-१ स्टुडंट व्हिसाधारक विद्यार्थ्यांचे वर्ग पूर्णपणे ऑनलाईन भरत असल्यास त्यांना अमेरिका सोडावा लागेल. त्यांना अमेरिकेतून बाहेर जायचं नसल्यास इतर शैक्षणिक संस्थांमधून प्रवेश घ्यावा लागेल. तरच त्यांचा व्हिसा वैध राहील,' असे अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम संचलनालयानं (आयसीई) स्पष्ट केलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर योग्य पावलं न उचलल्यास त्यांना परिणामांचा सामना करावा लागेल, असंदेखील आयसीईनं म्हटलं आहे. 'पूर्णपणे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील सेमिस्टरसाठी व्हिसा देण्यात येणार नाही. परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अमेरिकेचा जकात आणि सीमा सुरक्षा विभाग देशात प्रवेश देणार नाही,' अशी माहिती आयसीईनं दिली आहे. अमेरिकन सरकार शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एफ-१, तर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एम-१ व्हिसा देतं.अमेरिकेतल्या बऱ्याचशा महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी त्यांचा पुढील सेमिस्टरसाठीची योजना जाहीर केलेली नाही. काही शैक्षणिक संस्था ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांचा वापर करून हायब्रिड प्रारूप वापरण्याच्या विचारात आहेत. तर हावर्डसारख्या काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातून अमेरिकेत गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १० लाखांहून अधिक आहे. यामध्ये चीनमधील विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर भारत, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, कॅनडा यांचा क्रमांक लागतो.चिंता वाढणार? ...तर तब्बल ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागणार

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसाStudentविद्यार्थीEducationशिक्षण