शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

Coronavirus : फ्रान्समध्ये कोरोनाचा हाहाकार! 24 तासांत तब्बल 833 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 4:01 PM

Coronavirus : फ्रान्समध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 8911 पर्यंत पोहचली आहे.

पॅरिस - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 75,896 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 13,58,857 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 2,90,643 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 4000 वर पोहोचला आहे. फ्रान्समध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. 24 तासांत तब्बल 833 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

फ्रान्समध्ये सोमवारी ( 6 एप्रिल ) एका दिवसात कोरोनामुळे  833 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकाच दिवसात नोंदवण्यात आलेली ही सर्वाधिक संख्या आहे. फ्रान्सचे आरोग्य मंत्री ऑलिव्हर वेरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्समध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 8911 पर्यंत पोहचली आहे. तसेच कोरोनामुळे फ्रान्समध्ये 17 मार्चपासूनच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फ्रान्सने आता दररोज रुग्णालयासह नर्सिंग होममधील करोनाबाधितांच्या मृतांची संख्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. 

एकाच दिवसात मृत्यू झालेल्या नागरिकांमधील 605 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या 24 तासांत जवळपास 478 जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यानी दिली आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाखाजवळ पोहचली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ब्रिटनमध्येही शनिवारी (5 एप्रिल) एकाच दिवसात कोरोना व्हायरसमुळे 708 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 40 हजारांहून अधिक झाला आहे. तर ब्रिटनमध्ये आतापर्यंत 4313 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील सुमारे 200 देशांमधील विविध रुग्णालयांमध्ये 8 लाख 50 हजारांहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू असून त्यातील 40 हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे 8 लाख 11 हजार रुग्णांमध्ये कोरोनीची लक्षणे अतिशय सौम्य आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स हवाय?, मग 'या' ट्रिक्स करा फॉलो 

Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारी

Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा

Coronavirus: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या २४ तासात तब्बल ३५४ नवे रुग्ण

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFranceफ्रान्सIndiaभारतDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल