शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोना लसीसाठी कोव्हॅक्स योजना, ७६ देश सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 05:02 IST

कोरोना विषाणूवर तयार होणाऱ्या लसीचे जगभरात समप्रमाणात आणि योग्य किमतीला वितरण व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कोव्हॅक्स’ योजनेत जगातील ७६ श्रीमंत देश सहभागी झाले आहेत.

लंडन - कोरोना विषाणूवर तयार होणाऱ्या लसीचे जगभरात समप्रमाणात आणि योग्य किमतीला वितरण व्हावे यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कोव्हॅक्स’ योजनेत जगातील ७६ श्रीमंत देश सहभागी झाले आहेत. या योजनेचे सहनेतृत्व जागतिक आरोग्य परिषद करीत आहे.‘गावी’ व्हॅक्सिन अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सेठ बर्कले यांनी सांगितले की, कोरोना लस जेव्हा केव्हा उपलब्ध होईल, तेव्हा तिचे योग्य वितरण व्हावे यासाठी समन्वय योजना आखण्यात आली आहे. तिला ‘कोव्हॅक्स’ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेत जपान, जर्मनी आणि नॉर्वे यासारखे ७६ देश सहभागी झाले आहेत.आपल्या लोकांसाठी कोव्हॅक्समार्फतच लस खरेदी करण्याचे त्यांनी तत्त्वत: मान्य केले आहे. सहभागी देशांची संख्या आणखी वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही चीनशीही बोलत आहोत. कालच आमची चीन सरकारशी चर्चा झाली. आम्ही अद्याप कोणत्याही करारावर स्वाक्षरी केली नसली तरी बीजिंगचा प्रतिसाद सकारात्मक आहे.‘कोव्हॅक्स’चे नेतृत्व गावी,  WHO आणि कोअलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन (केपी) हे करीत आहेत. कोणत्याही सरकारने लसीची साठेबाजी करू नये आणि जास्त जोखीम असलेल्यांनाच पहिल्यांदा लस दिली जावी, यासाठी कोव्हॅक्सची उभारणी करण्यात आली आहे.अमेरिकेचासहभागास नकारअमेरिकेने कोव्हॅक्समध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. योजनेतील ‘WHO’चा सहभाग ट्रम्प प्रशासनास पसंत नाही. अमेरिकेचे मन वळविण्याचे प्रयत्न आम्ही सुरूच ठेवू, असे बर्कले यांनी सांगितले.लस खरेदीसाठी गरीब देशांना श्रीमंत देश करणार मदतलंडन : कोरोना विरोधात तयार होणारी लस सर्व देशांना समान पद्धतीने वितरित व्हावी, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोव्हॅक्स योजनेंतर्गत गरीब देशांना लस खरेदी करण्यासाठी श्रीमंत देश मदत करणार आहेत. ‘गावी’ व्हॅक्सिन अलायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सेठ बर्कले यांनी सांगितले की, कोव्हॅक्समधील श्रीमंत देश स्वखर्चाने कोरोना लस खरेदी करतील. तसेच ९२ गरीब देशांना लस खरेदीसाठी साह्य करतील. लस समान पातळीवर सर्वांना उपलब्ध व्हावी, यासाठी अशी योजना आखली गेली आहे. श्रीमंत देश द्विपक्षीय सौदे आणि अन्य योजनांमार्फतही लस खरेदी करण्यास मुक्त राहतील.  ही तर ईन्शुरन्स पॉलिसीबर्कले यांनी सागिंतले की, युरोपीय संघाने आधी कोव्हॅक्समार्फत लस न घेण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, आता युरोपीय संघाने आपली भूमिका बदलून कोव्हॅक्समध्ये सहभागी होण्याचे मान्य केले आहे. कोव्हॅक्स ही एक अमूल्य इन्शुरन्स पॉलिसी आहे, असे वर्णन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या