बिजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणू सापातून माणसामध्ये संक्रमित झाल्याची शक्यता तेथील संशोधकांनी व्यक्त केली आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत १८ जण मरण पावले असून सुमारे ६३० जणांना त्याची लागण झाली आहे. याचे संक्रमण होऊ नये, म्हणून चीनने वुहान आणि हुआंगगांग ही दोन शहरे बंद करून टाकली आहेत. तेथील रहिवाशांना कारणाविना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. तसेच तेथील वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.वुहान आणि हुआंगगांग या दोन्ही श्हरांमध्ये बाहेरील लोकांना जायलाही सध्या परवानगी मिळणार नाही, असे तेथील सरकारने स्पष्ट केले आहे. या शहरांतील चित्रपटगृहे, दुकाने मॉल, बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूचे सापातून संक्रमण? चीनमध्ये आतापर्यंत १८ बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 04:38 IST
चीनमध्ये कोरोना विषाणू सापातून माणसामध्ये संक्रमित झाल्याची शक्यता तेथील संशोधकांनी व्यक्त केली आहे.
कोरोना विषाणूचे सापातून संक्रमण? चीनमध्ये आतापर्यंत १८ बळी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}