शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

मोठी घडामोड! होर्मुज मार्ग खुला करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:48 IST

Strait of Hormuz Security Update: होर्मुज सामुद्रधुनीच्या सुरक्षेबाबत UN मध्ये शनिवारी मतदान होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा इशारा दिला असून UN प्रमुखांनी शांततेचे आवाहन केले आहे.

मध्य-पूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून जागतिक तेल पुरवठ्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'होर्मुजच्या सामुद्रधुनी' बाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत होणारे मतदान आता शनिवारी होणार आहे. बहरीनने मांडलेल्या या प्रस्तावावर शुक्रवारी मतदान होणे अपेक्षित होते, परंतु चीनच्या विरोधामुळे हा निर्णय लांबणीवर पडला आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट पावर प्लांट आणि पूल उडवण्याची धमकी देऊन युद्धाचा भडका उडवला आहे.

UN मध्ये का रखडले मतदान?
बहरीनने मांडलेल्या या प्रस्तावाचा मुख्य उद्देश होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक सुरक्षित करणे हा आहे. या प्रस्तावानुसार, देशांना आपल्या जहाजांच्या रक्षणासाठी आवश्यक ते 'संरक्षणत्मक उपाय' करण्याची मुभा मिळणार आहे. मात्र, चीनने यातील 'बळाचा वापर' करण्याच्या तरतुदीला विरोध दर्शवला आहे. चीनच्या मते, यामुळे या क्षेत्रात लष्करी हस्तक्षेप वाढून परिस्थिती अधिक बिघडू शकते. यामुळे शनिवारी हा प्रस्ताव पारित होण्याची शक्यता मावळली आहे. 

ट्रम्प यांचा 'पॉवर'फुल इशारा!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा खळबळजनक इशारा दिला आहे. "आमच्या सैन्याने अद्याप इराणमध्ये पूर्ण ताकदीने कारवाई सुरू केलेली नाही. येणाऱ्या काळात इराणचे महत्त्वाचे पूल आणि वीज प्रकल्प आमचे पुढचे लक्ष्य असू शकतात," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आखाती देशांमध्ये युद्धाची भीषणता वाढण्याची चिन्हे आहेत.

अँटोनियो गुटेरेस यांची शांततेसाठी साद
वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही बाजूंना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. "उध्वस्त करून नव्हे, तर संवादानेच प्रश्न सुटतील," असे सांगत त्यांनी आपला विशेष दूत जीन अर्नाल्ट यांना शांती चर्चेसाठी नियुक्त केले आहे. त्यांनी अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिन्ही देशांना संयम राखण्याची विनंती केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : China blocks Hormuz proposal; UN vote delayed amid rising tensions.

Web Summary : China opposed a UN proposal to secure Hormuz Strait, delaying the vote. Trump threatened Iran, escalating tensions. The UN urges dialogue amid rising fears of conflict in the Gulf.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धchinaचीनunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ