शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत ३० बसेस १८०० कि.मी. धावल्या; हाती पडले केवळ दीड लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

हिंगोली : कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शनिवार व रविवारला कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात एस.टी. बसेसला परवानगी ...

हिंगोली : कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शनिवार व रविवारला कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात एस.टी. बसेसला परवानगी असली तरी प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. हिंगोली आगाराला दोन दिवसांत ४६ फेऱ्यांमधून केवळ १ लाख ४० हजार रुपयेच हाती आले आहेत. या दोन दिवसांत ८ लाखांच्या नुकसानीचा फटकाही बसला आहे.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊन राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे. बाजारपेठ बंद असली तरी या काळात एस.टी. बसेस सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी एस.टी. आगार बसेस सोडत असले तरी लॉकडाऊनमुळे प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. हिंगोली आगाराला दरवर्षी लग्नसराईकाळात जवळपास दररोज सात लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, कोरोनाच्या काळात यात घट होत आगाराचे उत्पन्न दर दिवशी ४ लाखांवर आले. त्यात शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन केले जात असल्याने उत्पन्नात आखणी घट झाली आहे. सध्या सेनगाव, रिसोड, झिरो फाटा, अकोला, नांदेडपर्यंत बसेस सोडल्या जात आहेत.

आगारातील एकूण बसेसची संख्या - ५८

दोन दिवसांत धावलेल्या बसेस - ३०

फेऱ्या झाल्या आगारामध्ये -४६

पैसे मिळाले दोन दिवसांत - १ लाख ४० हजार

दोन दिवसांत ८ लाखांचा तोटा

हिंगोली आगारातून शनिवारी १५ तसेच रविवारीही १५ बसेस सोडण्यात आल्या. दोन दिवसांत १८०० कि.मी. बसेस धावल्या. त्यातून शनिवारी ७० हजार तर रविवारी ७० हजारांचे उत्पन्न हाती पडले. हिंगोली आगाराला दोन दिवसांत तब्बल ८ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. लग्नसराईकाळात हिंगोली आगाराचे उत्पन्न ७ लाख रुपयांपर्यंत जात होते.

रोटेशनप्रमाणे कर्मचारी कामावर

१) हिंगोली आगारात १२१ वाहक तर १२१ चालक कार्यरत आहेत. सध्या कोरोनामुळे बसेसच्या फेऱ्या घटल्या आहेत. त्यात शनिवार व रविवारी मोजक्याच फेऱ्या होत असल्याने यावर कर्मचारीही मोजकेच नियुक्त केले जात आहेत.

२) कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी त्यांना रोटेशन पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावर घेतले जात असल्याची माहिती आगारातून देण्यात आली.

स्थानकप्रमुखाचा कोट

कोरोनामुळे प्रवासी संख्या घटली तरी प्रवासी असलेल्या मार्गावरील सेनगाव, रिसोड, नांदेड, झिरोफाटा पर्यंत बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करावे, तोंडाला मास्क वापरावे, सॅनिटायझरचा वापर करावा.

- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली