शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
2
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
5
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
6
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
7
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
8
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
9
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
10
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
11
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
12
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
13
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
14
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
15
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
16
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
17
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
18
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
19
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
20
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत ९१ टक्के पण आता मोबाइलमध्ये गुंग; पालकांनी बोलताच एकुलत्या एक मुलाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 15:50 IST

''जास्त मोबाइल पाहू नको'', पालकांनी म्हणताच एकुलत्या एक मुलाने संपवले जीवन

आखाडा बाळापूर: नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात ९१ टक्के गुण मिळवून कुटुंबाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने किरकोळ कारणावरून रागाच्या भरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कळमनुरी तालुक्यातील बिबथर येथे घडली आहे. शिवम गोविंद शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

नेमका काय घडला प्रसंग?
गोविंद शिंदे हे आपल्या कुटुंबासह बिबथर येथे राहतात. त्यांना दोन मुली आणि शिवम हा एकुलता एक मुलगा होता. शिवम हिंगोली येथील शाळेत शिकत होता आणि सध्या सुट्ट्यांमुळे गावाकडे आला होता. शुक्रवार, १५ मे रोजी दुपारी शिवमने मोबाईल घेण्यासाठी हट्ट धरल्याने कुटुंबाने त्याला पैसे दिले. तो आखाडा बाळापूर येथून नवीन मोबाईल घेऊन सायंकाळी ५ वाजता घरी परतला.

रागात खोलीत निघून गेला अन् 
"एवढा महागडा मोबाईल कशाला घेतलास? आता सारखा मोबाईल पाहू नको, अभ्यास कर," असे कुटुंबातील सदस्यांनी त्याला सहज म्हटले. मात्र, या गोष्टीचा शिवमला तीव्र राग आला. त्याने घरात जाऊन एका खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला आणि गळफास लावला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडून पाहिले असता हा थरार समोर आला.

रुग्णालयात मयत घोषित
त्याला तातडीने आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शनिवार, १६ मे रोजी सकाळी त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी (Post Mortem) करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे आणि पथकाने रुग्णालयात जाऊन पाहणी केली. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या मुलाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Teen takes life after scolding over mobile phone use.

Web Summary : A 16-year-old student, who scored 91% in 10th grade, tragically ended his life in Bibthar after being scolded for excessive mobile phone use. He bought an expensive phone, prompting family to advise him to study. Upset, he locked himself in a room and committed suicide.
टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी