शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘माझे गाव, सुंदर गाव’ उपक्रमाला जिल्ह्यात प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST

हिंगोली : ‘माझे गाव, सुंदर गाव’ हा उपक्रम जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात असून, अधिकाऱ्यांसह सरपंच, उपसरपंचांसह गावकरीही या ...

हिंगोली : ‘माझे गाव, सुंदर गाव’ हा उपक्रम जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात असून, अधिकाऱ्यांसह सरपंच, उपसरपंचांसह गावकरीही या उपक्रमात सहभाग घेत असल्याची माहिती सहायक गटविकास अधिकारी जी.पी. बोथीकर यांनी दिली.

‘माझे गाव, सुंदर गाव’ हा उपक्रम २२ जानेवारी ते २० मार्चदरम्यान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावरून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, गावकरीही यात हिरीरीने सहभाग घेऊन गाव कसे सुंदर करता येईल, यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या उपक्रमातून तालुकापातळीवर प्रथम, द्वितीय व तृतीय याप्रमाणे ग्रामपंचायतींची निवड कशी करता येईल, यासाठीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास कळवावा, असेही उपायुक्त सुरेश बेथमुथा यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

‘माझे गाव, सुंदर गाव’ या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागाची संपूर्ण स्वच्छता करणे, सर्व उकिरडे गावाबाहेर काढणे, जनावरांचे गोठे स्वच्छ व आकर्षक करणे, रस्त्यावर जनावरे न बांधणे, गावातील सर्व कचरा घंटागाडीने जमा करून त्यावर प्रक्रिया करणे, कंपोस्ट खत तयार करणे, सर्व घरांमध्ये ओला, सुका कचरा विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे व प्रत्येक घरामध्ये दोन वेगळ्या ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र पेट्या ठेवणे, गावातील सर्व शौचालये वापरात आणून, रस्त्यावर व उघड्यावर शौचास जाणे बंद करावे, गॅस पाइपच्या झडपेवर जाळी बसविणे, सांडपाणी गावाच्या बाहेर काढणे, शोष खड्ड्यांचा वापर शंभर टक्के करणे, गावातील पाणी उघड्यावर येऊ न देणे, या उपक्रमांतर्गत सर्वांना सूचना दिल्या असून, सर्व जण यासाठी पुढाकार घेत आहेत.

बॉक्स

‘माझे गाव, सुंदर गाव’ या उपक्रमाचे मूल्यांकन २० मार्चनंतर केले जाणार आहे. २२ जानेवारीपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. आजमितीस मुख्य कार्यकारी अधिकारी आर.बी. शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे व पाचही तालुक्यांतील सर्व गटविकास अधिकारी, सर्व सहायक गटविकास, सरपंच, सर्व अंगणवाडीताई, सर्व आशा वर्कर, सर्व मदतनीस, उपसरपंच, ग्रामसेवक, गावकरी हे स्वच्छतेसाठी प्रयत्न करीत आहेत.

फोटो नं. १