शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठा खंडित; शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हिंगोली: जिल्ह्यात १९ मार्च रोजी तुरळक ठिकाणी वादळ, वारा, विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची ...

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

हिंगोली: जिल्ह्यात १९ मार्च रोजी तुरळक ठिकाणी वादळ, वारा, विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाच्यावतीने वर्तविण्यात आली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी जनावरे व जनावरांच्या चाऱ्याची साठवणूक योग्य ठिकाणी करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.

हळद काढणीला सुरुवात

हिंगोली: तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे व परिसरात गत दोन दिवसांपासून हळद काढणीला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा वाढू लागल्याने शेतकरी उन्हाच्या आधी हळद कशी काढता येईल, याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे हळदीचे उत्पन्न गतवर्षीपेक्षा कमी झाल्याने शेतकरी चिंतातूर झाल्याचे पहायला मिळत आहेत.

मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त

कळमनुरी: शहरातील मुख्य रस्त्यावर मागील काही दिवसांपासून वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात आहेत. त्यामुळे बहुतांश वेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वेळोवेळी शहर वाहतूक शाखेला कळविण्यात आले; परंतु अद्याप तरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. वरिष्ठांनी याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.

‘स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज’

कळमनुरी: येथील बसस्थानकात पाणी पाऊच, पाण्याची बॉटल, गुटख्याच्या पुड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकातील प्रवाशांना कचऱ्याचा त्रास होत आहे. मध्यंतरी काही प्रवाशांनी आगार प्रमुखांना बसस्थानकातील कचऱ्याबाबत सांगितले; परंतु अद्याप तरी दखल घेतली गेली नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन बस स्थानकात स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे.

वाडी- तांड्यांवर पाणीटंचाई

करंजी: वसमत तालुक्यातील करंजी परिसरातील वाडी-तांड्यावर तसेच छोट्या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणचे हातपंपही बंद पडलेले आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेता तालुका प्रशासनाने गावोगावी पाण्याची व्यवस्था करून ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

विरुद्ध दिशेने वाहतूक सुरूच

हिंगोली: शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, बस स्थानक परिसर आदी भागात मागील काही दिवसांपासून विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

‘जड वाहने बाजारपेठेत दाखल’

हिंगोली: जड वाहनांना शहरात परवानगी नसतानाही दोन-चार दिवसांपासून जड वाहने शहरात दाखल होत आहेत. जड वाहनांसाठी खटकाळी बायपास करून दिलेला असताना काही जड वाहने हे शहराच्या मध्यवस्थीतून बिनधास्त जात आहेत. जड वाहनामुळे बुधवारी दुपारच्या वेळेला काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन जड वाहनांना शहरातून प्रवेशबंदी करावी, अशी मागणी होत आहे.