शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचा फटका : सरपंचाने काम हिरावले, कंत्राटदाराने वाऱ्यावर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 15:48 IST

कामानिमित्त घर सोडून परराज्यात आल्याने (बेघर झाल्याने) राहावे तरी कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. 

ठळक मुद्दे हिंगोली जिल्ह्यात मजूर कुटुंबातील २२ जणांचे हाल गावी नेऊन सोडा- मजुरांची आर्त हाक

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील पुलाच्या कामावरून गावच्या सरपंचाने बाहेरच्या मजुरांना विरोध केला. गावाकडे सोडतो म्हणून कंत्राटदाराच्या माणसांनी हिंगोलीत आणले. मात्र, अजून व्यवस्था न झाल्याने टाळेबंदीच्या कचाट्यात सापडलेले २२ मजूर लहान-मुलाबाळांसह हिंगोली शहरातील चिरागशहा दर्गाह परिसरात थांबले आहेत. आता आम्ही जावे तरी कुठे? असा प्रश्न ते विचारत आहेत.

पोटाची खळगी भरण्यासाठी राज्य, परराज्यातून हिंगोली जिल्ह्यात कामानिमित्त अडकलेल्या मजुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. लॉकडाऊमुळे घरी जाता येईना अन् आपले दु:खही कोणाला सांगता येईना, अशी परिस्थिती त्यांच्यासमोर उभी राहिली आहे. कामानिमित्त घर सोडून परराज्यात आल्याने (बेघर झाल्याने) राहावे तरी कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मध्यप्रदेशातील रतलाम येथील बसंतीलाल माळी हे फेब्रुवारी २०२० या महिन्यात कुटुंबासह सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथे सुरू असलेल्या रस्ता पुलाच्या बांधकामासाठी आले होते. त्यांच्यासोबत इतर चार ते पाच कुटुंबातील मंडळीही आहे. लहान मुलाबाळांसह मिळून जवळपास २२ जण आहेत. परंतु कोरोना विषाणूमुळे सध्या देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटका त्यांना बसला आहे. गावातील सरपंचांनी स्थानिकांना काम द्या म्हणून या मजुरांना विरोध केल्याचे बसंतीलाल माळी सांगत आहेत. 

तर संबंधित कंत्राटदाराकडील कर्मचाऱ्यांनी तुम्हाला तुमच्या गावी नेऊन सोडतो असे सांगून त्यांना १६ मे रोजी हिंगोलीत आणले. त्यानंतर या सर्व मजुरांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्य तपासणी करून घेतली.  त्यामुळे आता आपल्याला गावी परतता येईल या आशेने हे सर्व मजूर कंत्राटदाराची वाट पाहात आहेत. वाहनाची व्यवस्था करतो असे म्हणून निघून गेलेला कंत्राटदार मात्र आतापर्यंत आमच्याकडे फिरकलाच नाही, असे बसंतीलाल यांनी सांगितले. 

गावी नेऊन सोडा- मजुरांची आर्त हाकजिल्हा प्रशासनाने आम्हाला आमच्या गावी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनवणी हे मजूर करीत आहेत. हे सर्वजण कोरोनाच्या भीतीने सध्या चिरागशहा दर्गा परिसरातच वास्तव्यास आहेत. सोबत काही रेशन आहे. त्यावर सध्या ते गुजराण करीत आहेत. परंतु आता रेशनही संपत आले आहे, त्यामुळे प्रशासनाने आम्हा मजुरांची दखल घ्यावी, आमच्या गावी नेऊन सोडावे, अशी आर्त हाक हे मजूर देत आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोलीLabourकामगारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस