शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीयच्या परीक्षांबाबत योग्य तो निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST

हिंगोली : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शाखेच्या परीक्षा घेणे धोक्याचे असून, त्या पुढे ढकलण्याची मागणी करणारे ...

हिंगोली : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शाखेच्या परीक्षा घेणे धोक्याचे असून, त्या पुढे ढकलण्याची मागणी करणारे ट्विट खा. ॲड. राजीव सातव यांनी केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दखल घेतली, तर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासनही दिले.

या संदर्भात खासदार ॲड. सातव यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात ट्विटरवरून सूचना मांडली. तसेच पत्रही दिले होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आता वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा असून, राज्यभरातून सुमारे ५० हजारांवर विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत अशा परीक्षा घेणे धोक्याचे आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सातव यांनी देशमुख यांच्याकडे केली होती. यावर मंत्री देशमुख यांनी या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करीत आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. संबंधित विभागाला विश्‍वासात घेऊन परीक्षेबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्‍वासनही देशमुख यांनी दिले आहे.