शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कत्ती घेऊन धावून आलेल्या पतीचा पत्नीने केला खून, मृतदेह पेटवत आत्महत्येचा रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:31 IST

खून केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा पत्नीने रचलेला बनाव उघड, पत्नीच्या हाती बेड्या

- दिलीप कावरखेगोरेगाव (जि. हिंगोली) : डोक्यात कत्तीचे घाव घालीत विवाहित महिलेने पतीचा खून केल्याची घटना ३ जून रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे घडली. मृतदेह पेटवून देत आत्महत्येचा बनाव केला. परंतु शवविच्छेदनाप्रसंगी डोक्यावरील कत्तीचे घाव दिसून आल्याने खुनाचे बिंग फुटले. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात सदर प्रकरणी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

कैलास भगवानराव गलंडे (वय ४०) हा दारू पिऊन आपल्या पत्नीसोबत वाद घालीत भांडण करत होता. ३ जून रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कैलास हा शिवीगाळ करीत पत्नीच्या अंगावर कत्ती घेऊन गेला. यावेळी पत्नीने झटापट करत हातातील कत्ती हिसकावून घेतली, आणि पतीच्या डोक्यात वार केले. डोक्यातून रक्तस्त्राव होऊन कैलास निपचित पडला. पती काहीच हालचाल करीत नाही हे पाहून पत्नी हादरली. खुनाचा गुन्हा लपविण्यासाठी घरासमोरील दुचाकीमधून पेट्रोल आणत पती कैलासच्या मृतदेहावर ओतून पेटवून दिले. तसेच सर्व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

मुलाच्या फिर्यादीवरुन आईविरुद्ध खुनाचा गुन्हा...३ जून रोजी पतीने पेटवून घेत आत्महत्या केल्याचा बनाव केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. मयताच्या डोक्यात कत्तीचे घाव दिसून आल्याने मयताच्या नातेवाईकांकडून सदर आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरा मयताचा मुलगा गणेश कैलास गलंडे (रा. बाभुळगाव) यांच्या फिर्यादीवरून आई सुमित्रा कैलास गलंडे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, सहायक पोलिस उपनिरीक्षक नितेश लेनगुळे यांच्यासह इतर पोलिसांनी बाभूळगाव येथील घटनास्थळाचा पंचनामा केला. आरोपी पत्नीला मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली