काँग्रेसतर्फे औंढा शहरात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 17:50 IST2020-10-01T17:48:56+5:302020-10-01T17:50:06+5:30

उत्तर प्रदेशातील पिडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ औंढानागनाथ  येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी  रास्ता रोको आंदोलन केले.

Block the road in Aundha city by Congress | काँग्रेसतर्फे औंढा शहरात रास्ता रोको

काँग्रेसतर्फे औंढा शहरात रास्ता रोको

औंढा नागनाथ : काँग्रेसच्या वतीने गुरूवारी औंढा शहरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशातील पिडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ औंढानागनाथ  येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी  रास्ता रोको आंदोलन केले.

त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करत औंढा येथील काँग्रेस कमिटीच्या वतीने बसस्थानकासमोर हे आंदोलन झाले. यादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासन आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली.

नगरसेवक सुमेध मुळे, बाळासाहेब देशमुख, पंकज जाधव, सुनील जोंधळे, किरण पाईकराव, महेंद्र जोंधळे, रवी पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.  या आंदोलनामुळे हिंगोली- औंढा मार्गावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. 

Web Title: Block the road in Aundha city by Congress