शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

रोहीच्या धडकेत जखमी सहाय्यक फौजदाराचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 12:55 IST

Assistant police inspector dies in Accident : कळमनुरी शहराजवळ रोही प्राण्याने दुचाकीला धडक दिल्याने ते गंभीर जखमी होते

ठळक मुद्देनांदेड येथील खाजगी रुग्णालयात नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती रात्री अचानक त्यांची प्रकृती पुन्हा खालावली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

सेनगाव ( हिंगोली ) : रोही प्राण्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कान्होजी मुकाडे (वय ५२ रा. जांब, ता. कळमनुरी) यांचा उपचारादरम्यान नांदेड येथे ७ जुलै रोजी मृत्यू झाला. ते सेनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, सेनगांव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कान्होजी रामचंद्र मुकाडे हे जानेवारी महिन्यात सेनगाव येथून कळमनुरीकडे दुचाकीने जात होते. त्यांची दुचाकी कळमनुरी शहराजवळ आली असताना अचानक रोही प्राण्याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये मुकाडे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात हलवले होते.

हिंगोलीत उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. तब्येत चांगल्या झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टीही दिली जाणार होती. मात्र ७ जुलै रोजी रात्री अचानक त्यांची प्रकृती पुन्हा खालावली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

कळमनुरी तालुक्यातील जांब येथील मूळचे रहिवाशी असलेले कान्होजी मुकाडे यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा या पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावले. हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर ते हिंगोली जिल्हा पोलिस दलात दाखल झाले. जिल्ह्यात त्यांनी हिंगोली, कळमनुरी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले. सध्या ते सेनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे............ 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसHingoliहिंगोली