सावधान! थंडीत वाढतो 'चिल ब्लेन'चा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 01:24 PM2021-01-02T13:24:44+5:302021-01-02T13:26:07+5:30

हा काही नवीन आजार नाही, हिवाळ्यात अनेकांना ही समस्या होते. खासकरून हिवाळ्यात ज्या महिलांना जास्त बाहेर काम करावं लागतं त्यांना ही समस्या होते. 

Winter disease chilblains symptoms, causes, treatment and preventions | सावधान! थंडीत वाढतो 'चिल ब्लेन'चा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय....

सावधान! थंडीत वाढतो 'चिल ब्लेन'चा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय....

Next

उत्तर भारतातील जास्तीत जास्त भागांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या दिवसात सर्दी-खोकल्याची समस्या अनेकांना होते. त्यासोबतच आणखी एक समस्या होण्याचा धोका अधिक वाढततो. ती समस्या म्हणजे 'चिल ब्लेन'. हा काही नवीन आजार नाही, हिवाळ्यात अनेकांना ही समस्या होते. खासकरून हिवाळ्यात ज्या महिलांना जास्त बाहेर काम करावं लागतं त्यांना ही समस्या होते. Ministry of Jal Shakti, Department of Water Resources, RD & GR या आजारीसंबंधी एक व्हिडीओ जारी केला आहे. 

कशी होते ही समस्या?

या आजारात लोकांच्या हात आणि पायांची बोटे, कानाच्या खालचा भाग लाल होऊन सुजतो. यावर खाज, गरमी आणि जळजळही होते. अनेकदा तर लोक खाजवण्याच्या नादात जखमाही करून घेतात. याने स्किन कॅन्सरचा धोका होतो. 

काय आहे याचं कारण?

ज्या लोकांची त्वचा अधिक संवेदनशील असते त्यांना फार जास्त थंडीनंतर जेव्हा अचानक गरमी मिळते किंवा गरमीतून अचानक थंडीत जातात अशांना चिल ब्लेनची समस्या होऊ शकते. ही समस्या सर्वात जास्त डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि जानेवारीच्या सुरूवातीला बघायला मिळते. कारण यादरम्यान थंडी खूप जास्त पडते.

चिल ब्लेन झाल्यावर काय करावे - काय करू नये?

जर चिल ब्लेनची लक्षणे तुमच्यात दिसत असतील म्हणजे खूप खाजवत असेल तर नखांनी खाजवण्याऐवजी कापडाने आरामात खाजवा. चिल ब्लेन ही समस्या झाल्यावर शरीराचा तो भाग आगीसमोर बसून गरम करू नका. याने समस्या अधिक वाढू शकते. यापासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात थोडं मिठ टाका आणि त्याने हात-पाय शेका. जास्त समस्या असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
 

Web Title: Winter disease chilblains symptoms, causes, treatment and preventions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.