शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात जेवणासोबत रोज खा पांढरे कांदे, फायदे वाचाल तर व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 12:28 IST

Onion Benefits In Summer : कांद्यामध्ये व्हिटामिन सी, लोह, गंधक, तांबे यांसारखे खनिज आहेत. ज्यामुळे शरिराची शक्ती वाढते.

Onion Benefits In Summer : आता गरमीला सुरूवात झाली आहे. अशात लोक शरीर थंड ठेवण्यासाठी वेगवेगळी उपाय करतात. तुम्हालाही माहीत असेल की, बरेच उन्हाळ्यात रोज जेवताना कांदा खातात. कारण याने शरीर थंड राहतं. त्यासोबतच उन्हाळ्यात याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. 

कांद्यामध्ये व्हिटामिन सी, लोह, गंधक, तांबे यांसारखे खनिज आहेत. ज्यामुळे शरिराची शक्ती वाढते. चला जाणून घेऊया कांद्याचे इतरही असे काही फायदे जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील.

1) उन्हाळ्यात कांदा नियमितपणे खाल्ला तर याने शरीराला अनेक फायदे मिळतात. याने तुमचा उन्हापासून बचाव होतो. कारण कांदा थंड असतो. याने शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. कांदा खाल्ल्याने तुम्हाला उन्ह लागत नाही. 

2) तसेच जर एखादा कीटक किंवा कीडा तुमच्या शरिरावर चावला असेल तर त्यावर लगेच कांदा कापून लावा. याने तुम्हाला लवकर आराम मिळेल.

3) कांदा हा थंड असल्याने जर तुमच्या हातावर जळहळ होत असेल, तर त्या जागेवर कांदा लावा. लगेच त्याचा फायदा बघायला मिळेल.

4) कांद्याचा रस कानावर आणि छातीवर लावल्यास उन्ह लागत नाही. असे केल्यास उष्माघातापासून तुमचा बचाव होऊ शकतो. यासोबत उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याचेही अनेक फायदे आहेत. 

5) अर्धा कप पांढऱ्या कांद्याच्या रसात गूळ आणि हळद मिक्स करून प्याल तर काविळापासून आराम आराम मिळू शकतो. लहान कांदा साफ करून चौकोनी आकारात कापा आणि ते लिंबूच्या रसात भिजवा. त्यावर मीठ किंवा काळं मीठ टाका. काविळावर हा चांगला उपाय मानला जातो. 

6) जर तुम्हाला कुत्र्याने चावले असेल तर त्या जखमेवर कापलेला कांदा मधात मिक्स करून लावा. त्याने विषाचा प्रभाव कमी होतो.

7) कांद्याच्या रसात मध मिक्स करून चाटण तयार त्याने दम्याचा त्रास कमी होतो. यासोबतच खोकल्यासाठीही या उपाय चांगला मानला जातो.

8) मुलांना अतिसार झाल्यास कांदा बारीक करून त्यांच्या बेंबीवर लावा किंवा कपड्यात बांधून पोटावर लावा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य