AI च्या अधिक वापराने मेंदूवर काय प्रभाव पडतो? रिसर्चमधून समोर आली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:20 IST2026-04-22T12:20:04+5:302026-04-22T12:20:44+5:30
AI Impact on Mental Health : AI संदर्भात झालेल्या एका संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे. AI चा अति वापर केल्यास माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

AI च्या अधिक वापराने मेंदूवर काय प्रभाव पडतो? रिसर्चमधून समोर आली धक्कादायक माहिती
AI Impact on Mental Health : AI आल्यापासून लोकांची अनेक कामे सोपी झाली आहेत. जास्तीत जास्त लोक महत्वाची माहिती मिळवण्यासाठी, ऑफिसची कामे करण्यासाठी एआयचा वापर करताना दिसतात. आजच्या काळात बहुतेक लोक छोट्या असोत वा मोठ्या गोष्टींबद्दल माहिती मिळवण्यासाठी AI चा वापर करतात. खासकरून ChatGPT चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, AI संदर्भात झालेल्या एका संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे. AI चा अति वापर केल्यास माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
संशोधनात काय समोर आले?
Massachusetts Institute of Technology Media Lab येथे 54 विद्यार्थ्यांवर एक अभ्यास करण्यात आला. त्यांच्या मेंदूच्या प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी त्यांना निबंध लिहायला सांगितले गेले. यासाठी विद्यार्थ्यांना तीन गटांमध्ये विभागले गेले. एका गटाने ChatGPT चा वापर केला, दुसऱ्या गटाने Google चा वापर केला आणि तिसऱ्या गटाने कोणतीही बाह्य मदत घेतली नाही. यानंतर संशोधकांनी त्यांच्या लेखनाची आणि मेंदूच्या क्रियाशीलतेची तुलना केली.
AI वापरणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत निष्कर्ष
ChatGPT चा वापर करून निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याच्या कौशल्यात काही प्रमाणात कमतरता दिसून आली. त्यांच्या लेखनात मौलिकतेचा अभाव होता. तसेच, त्यांना स्वतः लिहिलेला निबंध लक्षात ठेवण्यात अडचण आली. संशोधकांच्या मते, त्यांनी स्वतःच्या मेंदूचा कमी वापर केला.
Google वापरणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काय दिसलं?
Google चा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मेंदूची सक्रियता जास्त आढळली. त्यांनी माहिती शोधून त्यावर स्वतःचे विचार मांडले, त्यामुळे त्यांची क्रिएटिविटी टिकून राहिली.
कोणताही डिजिटल टूल न वापरणारे विद्यार्थी
ज्या विद्यार्थ्यांनी कोणतीही डिजिटल मदत न घेता निबंध लिहिला, त्यांच्यात सर्वाधिक मेंदूची सक्रियता दिसून आली. त्यांच्या क्रिएटिविटी आणि मेमरीमध्ये चांगला समतोल होता. त्यांनी लिहिलेला निबंध लक्षात ठेवण्यातही त्यांना अडचण आली नाही.
एकंदर काय तर AI उपयोगी आहे, पण त्याचा अति वापर टाळणे आवश्यक आहे. स्वतः विचार करून काम केल्यास मेंदू अधिक सक्रिय राहतो. AI ला सहाय्यक म्हणून वापरा, पर्याय म्हणून नाही.