शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Throat Infection: थ्रोट इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढतेय; रोज सरासरी ३० रुग्ण, काय काळजी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 09:46 IST

Throat Infection Outbreak: घशाचा संसर्ग ही सर्वसामान्य समस्या असली तरी त्यावर वेळेतच उपचार करणे गरजेचे असते. अन्यथा गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.

मुंबई : घशाचा संसर्ग अर्थात थ्रोट इन्फेक्शन ही एक आरोग्य समस्या आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर या आजाराचा सामना करावा लागू शकतो. घशाचा संसर्ग होण्याची वेगवेगळी कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे वातावरण बदल. त्यासाठी अनेकदा सुरुवातीच्या काळात काही वेळ घरगुती उपाय केले जातात. त्यात गरम पाण्याच्या गुळण्या करणे हा उपाय केला जातो.

काय काळजी घ्याल? थंड खाद्य आणि पेयपासून दूर राहावे. दोन-तीन दिवसांत खोकला बरे न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्या ठिकाणी धूळ प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल लावावा. 

घशाचा संसर्ग ही सर्वसामान्य समस्या असली तरी त्यावर वेळेतच उपचार करणे गरजेचे असते. अन्यथा गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. काही वेळा घशाच्या संसर्गामुळे ताप येतो. अशा रुग्णांना उपचारासाठी ॲण्टिबायोटिक्स द्यावे लागतात. हे आजार कमी तीव्रतेचे असतील तर एक-दोन दिवसांत घरगुती उपचाराने बरेसुद्धा होतात.  - डॉ. श्रीनिवास चव्हाण, कान-नाक-घसा विभाग प्रमुख, जेजे रुग्णालय.उन्हाळ्यात शिळं अन्न, दूध अन् फळं खात असाल तर दवाखान्यातच पोहचाल! पाहा काय खाणं टाळावंच.

रोज सरासरी ३० रुग्ण सरकारी रुग्णालयांतील कान-नाक-घसा या विभागाच्या ओपीडीमध्ये हे रुग्ण उपचारासाठी येतात. जे जे रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये या संसर्गाच्या ३० रुग्णांची नोंद केली जाते.

कारणे काय? रोगप्रतिकारशक्ती चांगली नसल्यास घशाचा संसर्ग लवकर होतो. तसेच बुरशीमुळेसुद्धा या आजारात भर पडते. घशात एलर्जी झाल्यामुळेसुद्धा बहुतांश वेळा शिंका येणे, नाकातून पाणी  येणे, डोळ्यांना खाज येण्यासारखी लक्षणे दिसतात. सिगारेटचा धूर, प्रदूषण आणि रासायनिक धूर यामुळे घशात जळजळ होऊन संसर्ग होत असतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यair pollutionवायू प्रदूषणMumbaiमुंबई