शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पोटावरील चरबी वाढण्याची कारणे आणि कमी करण्याचे सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 10:24 IST

यात जराही शंका नाही की, लठ्ठपणामुळे आपलं शरीर वेगवेगळ्या आजारांचं घर बनतं. डायबिटीस, हृदयरोग आणि हाडांशी संबंधित वेगवेगळ्या समस्या वेगाने वाढू लागतात.

(Image Credit : thefast800.com)

यात जराही शंका नाही की, लठ्ठपणामुळे आपलं शरीर वेगवेगळ्या आजारांचं घर बनतं. डायबिटीस, हृदयरोग आणि हाडांशी संबंधित वेगवेगळ्या समस्या वेगाने वाढू लागतात. खासकरून पोटावर आलेल्या चरबीमुळे आजार तर होतातच सोबतच तुमचा लूक आणि पर्सनॅलिटीदेखील खराब होते. अशात वाढतं पोट कमी करण्यासाठी पोट वाढण्याचं कारण तुम्हाला माहीत असायला हवं आणि त्यानंतर तुम्ही पोट कमी करण्याचं प्लॅनिंग करू शकता.

झोप पूर्ण न होणे आणि मद्यसेवन

झोप पूर्ण न होणे हे लठ्ठपणाचं मुख्य कारण आहे. बिझी शेड्यूलमुळे अनेकांना पुरेशी झोप घ्यायला मिळत नाही. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्ही खाताही जास्त. अशात लठ्ठपणा वाढण्याची शक्यता दुप्पट असते. तसेच अनेकजण दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्री मद्यसेवन करतात. याने थोडा तणाव दूर नक्कीच होतो, पण पोट वाढू लागतं. तसेच इतर समस्याही होतातच.

तेल, मैदा, साखर इत्यादींचं अधिक सेवन

आपला रोजचा आहार देखील आपलं पोट वाढवण्याचं काम करतं. तुम्ही ज्या तेलात पदार्थ तयार करता त्यात ओमेगा-६ फॅट अ‍ॅसिड जास्त असेल आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड फार कमी असेल तर याने सुद्धा तुमचा लठ्ठपणा वाढू लागतो. त्यासोबतच मैद्यापासून तयार पदार्थ खाल्ल्यानेही लठ्ठपणासोबतच डायबिटीस आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका असतो. सोबतच जर तुम्हाला गोड पदार्थ पसंत असतील तर यानेही तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो. आहारात सारखेचा वापर असलेले पदार्थ जसे की, फ्रूट ज्यूस, पेस्ट्री, केक, कॅंडीज, चॉकलेट इत्यादी पदार्थांमुळेही पोटावरील चरबी वाढते.

थोडं-थोडं खावं आणि पाणी पित रहावं

(Image Credit : allure.com)

आता तुम्हाला पोटावरील चरबी वाढण्याचं कारण माहीत झालं आहेच, तर ती कमी करण्याचे काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कधीही एकाचवेळी भरपूर खाऊ नका. थोडं-थोडं खावं. याने शरीराचं मेटाबॉलिज्म योग्य राहील आणि पोटावरील चरबी कमी करण्यासही मदत मिळते. तसेच जेव्हाही तुम्ही काही खाल तेव्हा मधे मधे एक एक घोट पाणी पित रहावे. असं केल्यास तुम्ही जास्त खाणार नाहीत. किंवा जेवणाआधी पाणी प्यावे म्हणजे पोट भरलं राहिल्याने जास्त खाणार नहीत. जर पाणी कोमट असेल तर उत्तम.

लिंबू आणि ओव्याचा चहा

लिंबाचं कोणत्याही प्रकारचं सेवन केल्यास लठ्ठपणा आणि एस्क्ट्रा चरबी दूर केली जाते. लेमन टी लोकांमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. वजन कमी करण्यासाठी लेमन टी फारच फायदेशीर मानला जाते. लेमन टीममध्ये साखरेऐवीज मधाचा वापर करावा. त्यासोबतच ओव्याने सुद्धा वजन कमी करण्यास मदत मिळते. गरम पाण्यात ओवा, बडीशेप, वेलची आणि आलं टाकून ५ मिनिटे उकडू द्या आणि नंतर गाळून सेवन करा.  

क्रंच एक्सरसाइज

(Image Credit : gethealthyu.com)

असं मानलं जातं की, क्रंच एक्सरसाइजने सर्वाच वेगाने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. ही एक्सरसाइज तुम्ही जेवढ्या जास्त वेळ कराल तेवढ्या लवकर तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकाल.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स