शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"कुठल्याही कंपनीचे आयुर्वेदिक औषध अजून कोरोनावर रामबाण व अंतिम उपचार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 06:48 IST

कोरोना उपचारात व लक्षणविरहित कोरोनारुग्णांसाठी कसा उपयोग करू शकते, याविषयी आयुष मंत्रालय कार्य करते आहे. तसेच, महाराष्ट्रातील वैद्यांचा टास्क फोर्स यावर काम करतो आहे.

- अमोल अन्नदाते,
एका प्रसिद्ध आयुर्वेद कंपनीने मोठी जाहिरात करून बाजारात आणलेले कोरोनावरील औषध अजून कोरोना साठीचे अंतिम औषध किंवा रामबाण उपाय म्हणून मान्यता मिळालेले नाही. आयुष मंत्रालय व आयसीएमआरने या औषधाची जाहिरात थांबवावी, असे निर्देशही या कंपनीला दिले आहेत. आयुर्वेदाचा कोरोना उपचारात व लक्षणविरहित कोरोनारुग्णांसाठी कसा उपयोग करू शकते, याविषयी आयुष मंत्रालय कार्य करते आहे. तसेच, महाराष्ट्रातील वैद्यांचा टास्क फोर्स यावर काम करतो आहे.
संबंधित कंपनीने आणलेल्या औषधांचे ट्रायल घेतले आहे, असा दावा त्यांच्याकडून केला गेला आहे. पण, एखादे क्लिनिकल ट्रायल यशस्वी आहे व संबंधित औषध आता वापरले जाऊ शकते, यासाठी काही निकष असतात. यात किती लोकांवर ते केले आहे (सॅम्पल साईज), त्या अभ्यासाचा प्रकार कसा होता (स्टडी डिझाईन), त्या क्लिनिकल ट्रायलचे विश्लेषण करण्यासाठी हाती आलेल्या निकालाचे कसे विश्लेषण केले आहे. (स्टॅटीस्टीकल मेथड), त्याचे नंतर टीकात्मक विश्लेषण (क्रिटीकल अ‍ॅनॅलिसीस) झाले का व याचे स्टॅस्टीटीक्स म्हणजे संशोधनातील आकडेवारीचे विश्लेषण करणाऱ्यां कडून चाचपणी व इतर तज्ज्ञांकडून मते मागवणे (पीर रिव्हीव्यू) या कुठल्याही पद्धतीने या औषधाचे क्लिनिकल ट्रायल केलेले दिसत नाही. या कंपनीचे आयुर्वेदिक औषधच काय, पण इतर कुठले ही अ‍ॅलोपॅथीचे औषध ही अजून या निकषात बसून कोरोनासाठी शंभर टक्के उपचार म्हणून मान्यता पावलेले नाही. नुकतेच जे औषध एका कंपनीने बाजारात आणले आहे त्याचा प्रचार समाज माध्यमांवर व वैयक्तिक पातळीवर सुरु झाला आहे. पण, अशा औषधापासून सर्वांनी सावध राहायला हवे. आयुर्वेद नक्कीच पुरातन चिकित्सा पद्धती आहे व आयुष मंत्रालय यावर वेळोवेळी निर्देश देते आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
म्हणून ही मार्गदर्शक तत्त्वे सोडून
इतर कुठले ही कंपनीचे कोरोनासाठी उपाय म्हणून बाजारात आणलेले औषध घेऊ नये. तसेच आयुष मंत्रालयाचे बहुतांश निर्देश हे प्रतिबंधासाठी आहेत. हे घेत असताना अ‍ॅलोपॅथीचे उपचार सोडू नये.

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या