शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 08:48 IST

डॉ. रोहित हेगडे श्वसनविकार तज्ज्ञ, सर जे जे रुग्णालय मुंबई हे देशातील सर्वांत गजबजलेले आणि दाट लोकवस्तीचे शहर आहे. ...

डॉ. रोहित हेगडेश्वसनविकार तज्ज्ञ, सर जे जे रुग्णालय

मुंबई हे देशातील सर्वांत गजबजलेले आणि दाट लोकवस्तीचे शहर आहे. वेगाने होणारे  शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाढती वाहतूक, बांधकामे आदी सर्व घटक शहरातील वायुप्रदूषणात मोठी भर घालतात. याचाच एक गंभीर परिणाम म्हणजे - पीएम २.५ कणांची वाढलेली पातळी, जी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरते. 

पीएम २.५ म्हणजे काय ? पीएम २.५ हे सूक्ष्म श्वसनक्षम कण असतात, जे २.५ मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी आकाराचे असतात. मानवी केसाच्या तुलनेत हे कण सुमारे ३० पट लहान असून, हवेत सहज मिसळतात आणि श्वसनमार्गाने फुफ्फुसांत प्रवेश करतात. हे कण मुख्यतः वाहतुकीमधून निर्माण होणाऱ्या धुरातून, औद्योगिक प्रक्रियांमधून, बांधकामच्या धुळीमधून आणि कचऱ्याच्या जळणीतून हवेत मिसळतात.

स्वच्छ हवा हा मूलभूत अधिकार ? स्वच्छ हवा ही प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने कडक उपाय करणे आवश्यक आहे. यामध्ये हरितवाहनांना प्रोत्साहन, बांधकाम नियमांचे पालन, औद्योगिक नियंत्रण इत्यादींचा समावेश असावा. दुसरीकडे नागरिकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.

आरोग्यावर दुप्परिणामप्रदूषित हवेमुळे सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मनरी डिसीज), फुफ्फुसांचा कर्करोग, आणि लंग्स फायब्रोसिस यांसारखे गंभीर आजार वाढत आहेत. या आजारांमध्ये रुग्णांचे श्वास घेणे कठीण होते, फुफ्फुसांची कार्यक्षमता घटते आणि शेवटी मृत्यूचा धोका वाढतो. काही वर्षांपासून लहान मुलांमध्ये दमा, सततचा खोकला, ब्राँकायटिस, श्वसनाचा त्रास यासारख्या लक्षणांमध्ये वाढ झाली आहे. तसेच, वयस्कर व्यक्तींमध्ये हृदयरोग आणि स्ट्रोकच्या घटनाही वायुप्रदूषणामुळे वाढल्या आहेत. पीएम २.५  कण रक्तप्रवाहात प्रवेश करून शरीराच्या इतर अवयवांवरही परिणाम करू शकतात.

हवा तपासणी, खबरदारीचे उपाय मुंबईत हवा गुणवत्ता निर्देशांक  २०० पेक्षा अधिक नोंदवला जातो, जो ‘मध्यम ते धोकादायक’ श्रेणीत मोडतो. मोबाइल ॲप किंवा वेबसाइटद्वारे हवेच्या गुणवत्तेचे तपशील पाहू शकता.

प्रदूषण वाढले असेल तर...> शक्यतो घरातच राहावे> बाहेर पडताना मास्क वापरावा.> हवामान स्वच्छ करणारे उपकरण (एअर प्युरिफायर) वापरणे उपयुक्त.> सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करून खासगी वाहनांचे प्रमाण कमी करावे.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणHealthआरोग्यMumbaiमुंबई