शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

'या' वयाआधीच लठ्ठ झालात तर कॅन्सरपासून तुमची सुटका नाही' - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 10:16 AM

वजन वाढल्याने स्त्री आणि पुरूष दोघांमध्ये लठ्ठपणासंबंधी कॅन्सर होण्याचा धोका १५ टक्क्यांनी वाढतो.

(Image Credit : independent.co.uk)

एका नव्या रिसर्चमध्ये असं आढळलं आहे की, ४० वय होण्याआधी वजन वाढल्याने किंवा लठ्ठपणामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचा म्हणजेच कर्करोगाचा धोका वाढतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, ४० वयाआधी वजन वाढल्याने अंतर्गर्भाशय कॅन्सर होण्याचा धोका ७० टक्के, किडनीच्या पेशींचा कॅन्सर होण्याचा धोका ५८ टक्के, कोलोन कॅन्सर होण्याचा धोका २९ टक्क्यांनी वाढतो.

(Image Credit : singularityhub.com)

रिसर्चमध्ये असं आढळलं की, वजन वाढल्याने स्त्री आणि पुरूष दोघांमध्ये लठ्ठपणासंबंधी कॅन्सर होण्याचा धोका १५ टक्क्यांनी वाढतो. अभ्यासकांनी तीन वर्षांत वेगवेगळ्या वेळात वयस्क लोकांचं दोनदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वजन केलं होतं. यात त्यांना कॅन्सरची शक्यता होण्याआधीही त्यांचं वजन केलं होतं. अभ्यासकांनी कॅन्सरच्या धोक्यासंबंधी चयापचय कारणांची तपासणी करण्यासाठी २००६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'मी कॅन' रिसर्चमधील २२०,००० व्यक्तींच्या आकडेवारीच्या वापर केला.

यात नॉर्वे, स्वीडन आणि ऑस्ट्रियाचे जवळपास ५,८०,००० लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते.  रिसर्चमध्ये सांगण्यात आले की, २७,८८१ लोक ज्यांना टेस्टदरम्यान कॅन्सर असल्याची माहिती मिळाली, त्यातील ९७६१ म्हणजे साधारण ३५ टक्के लोक लठ्ठपणाने ग्रस्त होते. अभ्यासकांनुसार, सामान्य बीएमआय असलेल्या लोकांच्या तुलनेत पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टमध्ये ३० पेक्षा अधिक बॉडी मास इंडेक्स असलेल्या लोकांमध्ये लठ्ठपणाशी संबंधित कॅन्सर विकसित होण्याचा धोका सर्वात अधिक होता.

(Image Credit : financialexpress.com)

रिसर्चचे सह-लेखक टोने बजॉर्ग म्हणाले की, 'पुरूषांमध्ये हा धोका ६४ टक्के आणि महिलांमध्ये ४८ टक्के आहे. आता आमचा मुख्य उद्देश हा आहे की, वजन वाढणं रोखण्यासाठी आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी एक महत्वपूर्ण रणनीति आणखे'.

टॅग्स :Researchसंशोधनcancerकर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्स