कित्येक वर्ष स्मोकिंग करतो...काहीच झालं नाही, असं वाटतं? यावर डॉक्टरांचं मत वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 11:41 IST2026-05-01T11:39:57+5:302026-05-01T11:41:07+5:30

Does Smoking Cause Damage Without Symptoms : अनेकांना तर असंही वाटतं की, 'मी तर कितीतरी वर्षांपासून स्मोक करतो, पण मला कधी काही त्रास झाला नाही'. हा जरी मनाला दिलासा देणारा समज असला तरी डॉक्टरांचं यावर वेगळंच मत आहे.

How smoking silently damage your body, know what doctor tells | कित्येक वर्ष स्मोकिंग करतो...काहीच झालं नाही, असं वाटतं? यावर डॉक्टरांचं मत वाचून बसेल धक्का

कित्येक वर्ष स्मोकिंग करतो...काहीच झालं नाही, असं वाटतं? यावर डॉक्टरांचं मत वाचून बसेल धक्का

Does Smoking Cause Damage Without Symptoms : धुम्रपान करणं आरोग्यासाठी किती घातक असतं हे आपल्याला माहीत आहेच. हेल्थ एक्सपर्ट सतत लोकांना धुम्रपानाची सवय सोडण्याचा सल्ला देतात. इतकंच काय तर प्रत्येक सिगारेटच्या पाकिटावरही 'सिगरेट इस इंज्युरिअस टू हेल्थ' असं ठळकपणे लिहिलेलं असतं आणि जळालेल्या फुप्फुसांचा फोटोही असतो. तरी सुद्धा काही लोक सिगारेट ओढणं सोडत नाही. ही एक अशी सवय आहे जी सोडणं फारच अवघड मानलं जातं. बरं अनेकांना तर असंही वाटतं की, 'मी तर कितीतरी वर्षांपासून स्मोक करतो, पण मला कधी काही त्रास झाला नाही'. हा जरी मनाला दिलासा देणारा समज असला तरी डॉक्टरांचं यावर वेगळंच मत आहे. शरीरात काहीच चुकीचे संकेत न दिसणं म्हणजे शरीर आतून चांगलंच असेल असा समज पाळणं म्हणजे फार चुकीचं. अनेकदा शरीराची ही शांतता, आता हळूहळू मोठी गडबड होत असल्याचा संकेत असते. 

काय सांगतात एक्सपर्ट

TOI ला श्वसन रोग तज्ज्ञ डॉ. हरीश भाटिया सांगतात की, त्यांच्याकडे रोज कितीतरी असे रूग्ण येतात ज्यांना वाटतं, सगळं सामान्य आहे. पण मुळात शरीरात आधीच बदल सुरू झालेले असतात. फुप्फुसं सुरूवातीला त्रास देत नाहीत, ते हवा स्वच्छ करतात. छोट्या छोट्या नुकसानाचं रिपेअर करतात आणि मोठा काळ दबावाचा सामना करत असतात. पण रोज स्मोक केल्याने विषारी तत्व शरीरात जमा होऊ लागतात. 

पण अडचण ही आहे की, जेव्हा शरीर एखाद्या स्थितीसोबत ताळमेळ बसवून घेते, तेव्हा आपल्याला सगळं चांगलं असल्याचं वाटतं. जशी एखाद्या गोष्टीची सवय झालेली असते, तसंच शरीर हे नुकसान सहन करू लागतं. पण याचा अर्थ असा होत नाही की, नुकसान थांबलं आहे.

सगळं ठीक वाटतं, पण तसं असतं का? डॉक्टर सांगतात की, ठीक वाटणं हा काही आपण सुरक्षित असण्याचा संकेत नाही. आतल्या आत अनेक बदल होत राहत असतात. श्वसननलिका आतून हळूहळू आकुंचन पावतात. फुप्फुसांचा लवचिकपणा कमी होतो, रक्तवाहिन्या कठोर होऊ लागतात आणि शरीरात ऑक्सीजनचा फ्लो प्रभावित होतो. शरीर कोणत्याही संकेतांशिवाय वेदना आणि दबाव सहन करत असतं.

हळूहळू वाढते समस्या

एक्सपर्ट सांगतात की, धुम्रपानाशी संबंधित आजार अचानक होत नाहीत, हळूहळू वाढतात. यात श्वासासंबंधी आजार, लंग्स कॅन्सर आणि हृदयरोग यांचा समावेश करता येईल. अनेकदा या आजारांची माहिती तेव्हा मिळते, जेव्हा शरीराचं आधीच खूप नुकसान झालेलं असतं. 

सगळ्यात धक्कादायक बाब ही आहे की, अनेकदा पहिला संकेतच फार गंभीर असतो, जसे की, हार्ट अॅटॅक किंवा लकवा. लक्षणं समोर येईपर्यंत शरीराचं आतून फार नुकसान झालेलं असतं. हेच कारण आहे की, 'मी बरा आहे' हा विचार फार घातक आहे. 

दिलासादायक बाब ही आहे की, धुम्रपान सोडल्याने कोणत्याही वयात फायदा मिळतो. काही दिवसांमध्येच हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. काही महिन्यात फुप्फुसांची काम करण्याची क्षमता सुधारते आणि पुढे गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो.

Web Title : धूम्रपान: लक्षण नहीं मतलब सुरक्षित नहीं, डॉक्टरों की चेतावनी।

Web Summary : धूम्रपान करने वालों को ठीक लग सकता है, लेकिन डॉक्टरों का कहना है कि नुकसान चुपचाप होता है। फेफड़े शुरू में सामना करते हैं, लेकिन विषाक्त पदार्थ जमा होते हैं, जिससे फेफड़ों के कार्य, हृदय संबंधी समस्याएं और कैंसर धीरे-धीरे कम होते हैं। किसी भी उम्र में धूम्रपान छोड़ने से स्वास्थ्य लाभ होता है।

Web Title : Smoking damage: No symptoms doesn't mean safe, warns doctors.

Web Summary : Smokers may feel fine, but doctors warn damage occurs silently. Lungs initially cope, but toxins accumulate, leading to gradual decline in lung function, heart issues, and cancer. Quitting smoking at any age brings health benefits.